9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारी विरोधी दिवस
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2023/12/IMG-20231209-WA0000-780x470.jpg)
प्रतिनिधी…रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो 9921500780
आज आपल्यासमोर सर्वात मोठी समस्या आहे ती भ्रष्टाचार व लाचखोरी, भ्रष्टाचाराचे उगम स्थान असते व्यक्तीची अनैतिक व्यवहार आज जी दुर्गती , बेशिस्त आहे तिचे कारण आहे सामाजिक नैतिक मूल्यांचा हास, भ्रष्टाचार विश्वव्यापक समस्या आहे. आज देशभरात केंद्र ,राज्य, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत, पातळीवर जनतेला स्वतःची कामे करून घेण्यासाठी लाच देता – घेता आपण बघतो यावर उपाय करण्याचा विचार टाळण्याकडे सर्वांचा कल दिसतो असे वाटते की समाजाने भ्रष्टाचार हा जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून स्वीकारला आहे की काय या बेजबाबदार व्यवहाराला सामान्य माणूस कसा जबाबदार आहे त्यापेक्षाही कितीतरी पटीने शासनकरते, शासनप्रणाली जबाबदार आहे. आज सामान्य जनतेचे कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नसेल तर त्यांनी मतदानासाठी लाच घेतली म्हणून केवळ त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही त्यासाठी शासनप्रणाली, नैतिकतेच्या पायावर उभी करावी लागेल कारण माणूस जन्माने भ्रष्ट नसतो त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच, ईर्षा, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते . भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही असा एक सूर आहे. नुसते कायदे करून प्रश्न सुटतील असे वाटत नाही जोपर्यंत राज्यव्यवस्था आणि जनसामान्यांची भ्रष्टाचाराबद्दलची मानसिकता बदलत नाही मन, बुद्धी, व हृदयातून, भ्रष्टाचाराला जाळले जात नाही भ्रष्टाराच्या कल्पना किंवा वास्तव पुसले जात नाही आणि तशी कृती होताना दिसत नाही तसेच देश व जनते प्रति आपुलकी, सत्य प्रेमाची भावना जागरूक होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहणार, म्हणून निराश होऊ नका सर्व नागरिकांनी मनापासून प्रयास केला लाच देणार व घेणार नाही तर भ्रष्टाचाराला देशात कुठेही थारा येणार नाही.