राज्य उत्पादन शुल्क पालघर कार्यालयातील दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांच्या विरोधात लाचेची मागणी केल्या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
अर्जावर कार्यवाही करून बियर शॉपचे लायसन्स देण्याकरिता 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोड करून 3 लाख 40 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करणाऱ्या पालघर येथील दुय्यम निरीक्षक पदावर काम करत असलेले लोकसेवक नितीन संखे यांच्या विरोधात गुरुवारी पालघर पोलीस ठाण्यात अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे जानेवारी 2023 रोजी बिअर शॉपचे लायसन्स मिळण्याकरता राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पालघर येथे अर्ज केला होता. या कार्यालयात दुय्यम निरीक्षक पदावर काम करत असलेले नितीन संखे या लोकसेवकांनी तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बिअर शॉपचे लायसन्स देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 लाख 40 हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. याबाबत तक्रारदार यांनी नितीन संखे यांची लिखित तक्रार अँटीकरप्शन ब्युरो पालघर कार्यालयात केली होती. याबाबत पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, व अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची पालघर पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांनी पडताळणी केल्यावर नितीन संखे यांनी 3 लाख 40 हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. असे पडताळणी मध्ये सिद्ध झाल्यावर नितीन संखे यांच्या विरोधात गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत.