विशेष

विक्रमगड हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज विक्रमगड , तर्फे श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

ठाणे प्रतिनिधी राजेंद्र भगवान भोईर (मो.९०२८३०५३१९)

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यातील जांभा येथे विक्रमगड हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज विक्रमगड शाळेतर्फे वनराई बंधारा बांधण्यांत आला. शाळेकडुन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने विविध लोकोपयोगी उपक्रम केले जात असतात. याचाच एक भाग म्हणून गेली २३ वर्ष अविरतपणे (कोरोनाचा काळ वगळता) शाळा परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उपयोग होईल अशा उद्देशाने वनराई बंधारे बांधत असते.

या शैक्षणिक वर्षातील हा उपक्रम दिनांक ७ डिसेंबर रोजी शाळेतील जवळपास ३० शिक्षक व ३० निवडक महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या श्रमदानातून परिसरातील जांभा या गावाजवळील ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. सदर वनराई बंधाऱ्यामुळे परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेतीसाठी तसेच मोकाट फिरणाऱ्या

जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील याचा सदुपयोग होणार आहे. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

यावेळी वनविभाग जव्हारचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन त्यांनी विद्यार्थी व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button