अकलूज एस टी आगारातील बस चालक अमीन छबू मुलाणी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील एस टी आगारातील बस चालक अमीन छबू मुलाणी यांचे आज बुधवार दि.06 रोजी सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास महाळुंग रोड अकलूज येथील त्यांच्या राहते घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 43 वर्षांचे होते…
गेली पंधरा वर्षे ते अकलूज एस टी आगारात बस चालक म्हणून कार्यरत होते, त्यांचे पश्चात आई,बहिण,पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने एस टी आगारातील त्यांचे मित्र मंडळी व अकलूज परिसरातील अनेक जणांनी शोक व्यक्त केला…

अमीन छबू मुलाणी हे अत्यंत धार्मिक स्वभावाचे व मनमिळावू वृत्तीचे होते,आज दुपारी 3:00 वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी येथे त्यांच्यावर अंतिम दफनविधी करण्यात येणार आहे…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क समुहाच्या वतीने अमीन छबू मुलाणी यांना भावपुर्ण श्रद्धांजली..😔💐🙏ईश्वर अल्लाह त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.त्यांना जन्नत नसिब होवो😔💐💐



