महाराष्ट्र

मुलांचे पहिले पाऊल पडू लागले शाळेकडेचला,वाजतगाजत नेऊ त्यांना ज्ञानाच्या मंदिराकडे …..

प्रतिनीधी… रियाज मुलाणी
मो.9921500780

जि.प.शाळा संग्रामनगर (माळीनगर) येथे इ.पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला …या कार्यक्रमानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रातील (माळीनगर) वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल तळेकर मॅडम उपस्थित राहिल्या .

तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.पूजा लोखंडे व उपाध्यक्षा सौ.गोरे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना वह्या ,पेन ,पुस्तके,खाऊ वाटप करण्यात आले .

विषेश बाब म्हणजे इ.पहिलीत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले.शालेय पोषण आहारामध्ये गोड शिरा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनोद थोरात सर यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button