भिमरावजी भवरे हे राष्ट्रीय संविधान पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
संविधान जनजागृती अभियान आणि निर्मिती विचारमंच,कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार-2023 या करीता महागांव तालुक्यातील मोहदी येथिल भिमरावजी भवरे यांची निवड करण्यात आली असून नव एप्रिल रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी अनेक दखलपात्र प्रस्ताव विचारमंचाकडे प्राप्त झाले होते. यातुन संविधान जनजागृती अभियान व निर्मिती विचारमंचाने महागांव तालुक्यातील मोहदी येथिल भिमरावजी भवरे यांच्यातील सामाजिक बांधिलकी समजून त्यांनी करीत असलेल्या संविधानवादी व्यक्तीमहत्वाच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार-2023 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुपारी १ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन.दत्त चौक कोल्हापूर येथे मा.किरण माने (सिने अभिनेते मुंबई,)शहाजी कांबळे जेष्ठ आंबेडकरी नेते कोल्हापूर, मा.प्रा.श्रीकृष्ण अडसूळ (जेष्ठ साहित्यिक गोवा),डॉ.शोभा चाळके (लेखिका व प्रकाशिका,कोल्हापूर.)डॉ.नंदकुमार गोंधळी (जेष्ठ कार्यकर्ते,कोल्हापूर.)सुनिल कांबळे (सिने अभिनेते कोल्हापूर.)आमदार राजीव आवळे (जेष्ठ नेते महाराष्ट्र),विजया कांबळे, (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मुंबई. )प्राचार्य डॉ.अरुण गाडे (जेष्ठ विचारवंत सातारा),ॲड.करुना विमल (अध्यक्षा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट.)अनिल म्हमाने (कवि लेखक व प्रकाशक कोल्हापूर,) सुहास बोधे (प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कोल्हापूर) या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे पत्राव्दारे निर्मिती विचारमंचातर्फे कळविण्यात आले आहे.



