शिव जयंती निमित्त शंभुराजे प्रतिष्ठान,महर्षी नगर यांच्यावतीने अन्नदान वाटप…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
शिव जयंती निमित्त “शंभुराजे प्रतिष्ठान” महर्षी नगर,शंकरनगर – अकलूज यांच्यावतीने अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला,मोहिते पाटील गटाचे युवा कार्यकर्ते अब्बासभाई शेख आणि अक्षय (भैय्या) कोकाटे यांनी घडवून आणलेल्या या कार्यक्रमाचे अनेक जणांनी कौतुक केले…
समाज सेवेचे अखंड व्रत हाती घेतलेले अब्बासभाई शेख टाइम्स 9 शी बोलताना असे म्हणाले की,महर्षी नगर येथे साला बाद प्रमाणे प्रत्येक सण,सामाजिक कामे आम्ही करतच असतो,शिव जयंतीचा उत्सव हि मोठया प्रमाणात साजरा करून अन्नदाना सारखे पवित्र कार्य “शंभुराजे प्रतिष्ठान” तर्फे घेऊन आम्हाला फारच आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,”शंभुराजे प्रतिष्ठान” च्या अंतर्गत भविष्यात देखील अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असुन अक्षय (भैय्या) कोकाटे यांच्या नेतृत्वात “शंभुराजे प्रतिष्ठान” हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहील…
अजमेरच्या “ख्वाजा गरीब नवाज” यांच्या वर अपार श्रध्दा असणारे अब्बासभाई शेख हे धार्मिक वृत्तीचे आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने जनमानसात लगेच मिसळून जातात आणि अगदी याच कारणाने ते मित्र मंडळी मध्ये आपले “अब्बास भाई” म्हणून हि ओळखले जातात…

मकर संक्रांत,शिव जयंती,गणेश उत्सव,रंग पंचमी,ईद उल फित्र,बकरी ईद सह अनेक सण आणि सामाजिक कामे महर्षी नगर येथे गुण्या गोविंदाने साजरे केली जातात…
यावेळी शंभुराजे प्रतिष्ठान च्या या अन्नदान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,युवा नेते जीवन जानकर,साजिदभाई सय्यद उपस्थित होते…

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव साठे,साजिद शेख,विजय सगर,अनिकेत शिंदे,अजय कोकाटे,मारुती यादव,राजू घोगरे,जीलानी शेख,ताजुद्दीन शेख,प्रकाश वाघमारे,गोरख सावळे,शहानुर पठाण,प्रकाश शिंदे,सनी भोसले,सत्तार शेख,गायकवाड,संगीता वसेकर,आशा इनामदार यांच्यासह महर्षी नगर परिसरातील सर्व महिला पुरुष उपस्थित होते…



