महाराष्ट्र

पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांना जी लोकाभिमुख मान्यता मिळाली ती नरेंद्र मोदी यांना नाही

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारे प्रसिध्दी मिळवून ते कसे लोकप्रिय नेते आहेत असे भासवून त्यांचे भाजपप्रणित कार्यकर्ते त्यांची प्रतिमा लोकप्रिय करण्यासाठी अनेक पध्दतीने विविध मार्गांनी बिंबवत आहेत पण मोदी हे सर्वसामान्य गोरगरीब उपेक्षित वंचित दुर्लक्षित अल्पसंख्याक घटकांचे कधीच होऊ शकले नाहीत उलट गोरगरिबांच्या अनेक कल्याणकारी योजना सवलती त्यांनी रोखण्यात धन्यता मानली आहे ते कार्पोरेट जगतातील बड्या धनदांडग्या चे ते मसिहा म्हणून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत

गेल्या नऊ वर्षांत त्यांनी अनेक मोठ्या वल्गना केल्या गरिबांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याची त्यांची घोषणा म्हणजे त्यांनी सत्तेत येण्यासाठी केलेली हातचलाखी आहे देशात बेरोजगारी वाढली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या केल्याचे दिसून येते मोदी यांचे सरकार हे भाजपचे आर एस एस व धर्मवादी पंडितांचे सरकार अशीच ओळख झाली आहे स्वर्गीय पंतप्रधान पंडित नेहरू इंदिरा गांधी यांना मरणोत्तर ही सर्वसामान्य बहुजन उपेक्षित वंचित दुर्लक्षित अल्पसंख्याक घटकांत लोकाभिमुख मान्यता मिळाली आहे

अनेक आठवणी त्यांनी राबवलेल्या विकासाभिमुख योजना कल्याणकारी योजना या सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आखल्या होत्या त्यांच्या काळात शेतकरी आत्महत्या करत नव्हते गोरगरिबांना मोफत शिक्षण वैद्यकीय सेवा नोकरी धंद्यांना मदत प्रोत्साहन दिले जात होते अनेक मोठे उद्योग धंदे आणले तत्कालीन कांग्रेस पक्ष कार्यकर्ते नेते महात्मा गांधी यांच्या स्वावलंबी धोरणानुसार सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना मदत करून पिडितांचे अश्रू पुसण्याचे काम करत होते अनेक आठवणी प्रसंग घटना योजना उपाय कर्तव्य आजही इतिहासाची साक्ष म्हणून सांगता येतील मोदींचे भक्त मोदींचे नेतृत्व भारतीयांवर लादत आहेत

मोदींच्या राजवटीत महागाई बेरोजगारी अत्याचार जातीयवाद वाढल्याने तसेच सध्या ज्या घटनेमुळे जगात भाजप सरकार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाचक्की झाली आहे मणीपूर घटनेने मोदी सरकार ची असली नसलेली प्रतिमा कलंकित झालेली आहे भारत देश हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा निधर्मी राष्ट्राची मुल्य संविधानाच्या चौकटीत राहून चालवायला हवा पण इथं नैतिक संविधानिक वैचारिक प्रागतिक पुरोगामी विचार मते मांडणारांची राष्ट्रभक्ती तपासली जाते त्यांच्या प्रामाणिक पणावर सांशकता घेतलीं जाते त्यामुळे मोदी विचार मोदी सरकार जनसामान्यांच्या मनात स्थान मिळवू शकले नाही

लोकशाहीचा इथं विचार निवडणुकीत प्रचार भाषण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो नेहरू गांधी घराण्याला त्याग बलिदानाचा वारसा आहे देशासाठी त्यांनी स्वतःची संपत्ती बहाल केली आहे कांग्रेस पक्ष निष्ठा कर्तृत्व विश्वास गरिबांचा ध्यास यासाठी झटत होते तर भाजप मध्ये दुसरीकडे जोपर्यंत नेते कार्यकर्ते आहेत ते भ्रष्ट स्वार्थी असतात भाजपमध्ये तेच नेते कार्यकर्ते आले की स्वच्छ चारित्र्याचे होतात आयाराम गयाराम संस्कृती जोपासण्यासाठी भाजप माहीर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button