पालघर जिल्ह्यातील वाडा मुसारणे येथे अनुदानित सिलिंडर मधून बेकायदेशीर व्यवसायक सिलिंडर रिफींग रॅकेट उद्ध्वस्त ३,३६, ८००₹ मुद्देमाल जप्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
अमेरिका इराण यांच्यातील निमार्ण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती परिस्थिती मूळ गॅस इंधन व सिलिंडर तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या औद्योगिक उत्पादनात व हॉटेल व्यावसायिक यांना गॅस सिलिंडरचा तूटवडा भासत आहे.
या संदर्भात शासनाने वेळोवेळी आपली भूमिका जाहीर करीत आहे. परंतु काही समाजकंटक आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात, भिवंडी–वाडा महामार्गालगत असलेल्या मौजे मुसारणे गावाजवळील एका सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग करून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळून आल्यानंतर दिनांक २७ मार्च २०२६ रोजी दुपारी अंदाजे भिवंडी-वाडा महामार्गालगत असलेल्या मुसारणे गावातील एका सिमेंट पत्रे असलेल्या शेडमध्ये घरगुती अनुदानित गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलिंडर मध्ये विनापरवाना बेकायदेशीर पणे रिफीलींग करून गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रक-शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यस्तरीय दक्षता पथकाने अचानक पणे पंचांसमक्ष छापा टाकून ही कारवाई केली असताना भिवंडी–वाडा रोडवरील हॉटेल शिवम इनजवळील बुध्द विहाराच्या बाजूला अंदाजे ५०० ते ८८० मीटर अंतरावर असलेल्या शेडमध्ये तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडर साठा व रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
या कारवाईत पथकाला ९१ घरगुती सिलेंडर ७५ रिकामे गॅस सिलेंडर तसेच १९ किलो व ५ किलोचे वजनाचे व्यावसायिक सिलेंडर आणि गॅस रिफींलीग साठी लागणारे ३ हाय-प्रेशर ट्रिपलेक्स पावर पंप, रिफिलिंगसाठी २ मोटार पंप, वजन करण्यात साठी ६ इलेक्ट्रॉनिक वजन काटे असा अंदाजे,-₹ ३, ३६, ८००/- रूपये पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वरिष्ठ सक्षम अधिकारी यांच्या कडून आदेश येईपर्यंत हा मुद्देमाल स्थानिक अधिकृत गॅस वितरकाकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे.
अनाधिकृत पणे गॅस सिलेंडर रिफिलिंग ठिकाणी काम करणारे १) धनराज माखने, २) कैलास राठोड व ३) प्रविण पवार यांची चौकशी केली असताना यांनी सांगितले मागील एक महिन्यापासून येथे काम करत असल्याची कबुली दिली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार देवा शंकर पवार असून तोच सिलेंडर आणणे व भरलेले सिलेंडर विक्रीसाठी नेण्याचे काम करत असल्याचे समोर आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर कार्यावर लक्ष ठेवून आहेत. आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच एलपीजी वितरण नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



