महाराष्ट्र

कुणबी चे दाखले मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला मिळावेत..लियाकत शेख, अध्यक्ष, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम फौडेशन यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुणबी चे दाखले मराठा समाजा बरोबर कुणबी नोंद असणा-या मुस्लिम बाधंवासह सरसकट मुस्लिम बाधंवाना मिळावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली डाॅ ए पि जे अब्दुल कलाम फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष लियाकत शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात महसुल दफ्तरी तसेच इतर शासकीय दफ्तरात कुणबी दाखले संदर्भात जुन्या नोंदी पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली आहे . शिंदे समितीच्या माध्यमातून जुन्या महसुली नोंदी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात तसेच इतरत्र शोध मोहीम चालू आहे. कुणबी पुरावे शोधत असताना निजामकालीन दस्तऐवज किंवा जन्म मृत्यू दाखले, शाळेचे दाखले व इतर महसुली नोंदी मध्ये मराठा समाजाच्या नोंदी बरोबर मुस्लीम समाजातील नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी – मुस्लीम असा उल्लेख असलेल्या नोंदी आढळून आल्या आहेत.

त्यामुळे मुस्लीम समाजातील ज्या नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी मुस्लिम नोंदी आढळून आलेल्या आहेत अशांना कुणबी – मराठा नोंदी बरोबर आढळलेल्या कुणबी – मुस्लीम नोंदी असा जातीचा दाखला देण्यात यावा . मुस्लीम समाजातील कुणबीच्या नोंदी ग्राह्य धरुन मुस्लीम समाजाला सरसकट इतर मागासवर्गात समावेश करून न्याय देण्यात यावा व त्यांना मराठा समाजातील बांधवा प्रमाणेच मुस्लीम समाजाला सुद्धा या सर्व सवलती मिळाव्यात. त्यांना सोयी,सुविधा, सवलतीपासून वंचित ठेवु नये अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लियाकत शेख व सकल मुस्लीम समाजाने महाराष्ट्र राज्य सरकारला लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनावर हाजी लियाकत शेख, रमजान बेग, सुरज शेख,समीर शेख, जमीर सय्यद, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, झिशान कबीर, जहाँगीर बेग, इमत्याज पठाण,फिरोज बेग, राजु बेग,आलीम खान, इसाक शेख, मोहसीन शेख , शाहीद बेग, मुन्ना सय्यद आदि मान्यवर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

मुस्लिम समाजातील आतार, मणियार, बागवान, तांबोळी, मुलाणी,कसाब,खाटिक आदी जाती या ओबीसी गटात मोडत आहेत. मात्र या जातीशिवाय खुल्या वर्गात असणारे शेख, सय्यद, पठाण ,काझी, इनामदार आदी जातीचेही मागासलेपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही संपलेले नाही. या जाती ही मराठा समाजा बरोबरच मागासलेले आहेत. त्यामुळे सरसकट या जातीनाही ओबीसी मध्ये प्राधान्य देऊन त्यांच्या खुला गटातील वर्ग काढून इतर मागासवर्गीत सरसकट समाविष्ट करावे. त्यामुळे या जातीचेही मागासले पण संपुष्टात येईल.शिंदे समितीनेही याचा गांभीर्याने विचार करावा.
सुरज शेख, सामाजिक कार्यकर्ते, करमाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button