इस्लामपूर ते आवाटी ही गाडी पूर्वतप्रमाणे चालू करण्याची आवाटी येथील सरपंच साबीर खान पठाण यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
आलिम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
इस्लामपूर ते आवाटी ही एसटी बस पूर्ववतप्रमाणे चालू करावी अशी मागणी येथील आवाटी येथील सरपंच साबीर खान पठाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान पठाण यांनी संयुक्तरित्या एका निवेदनाद्वारे इस्लामपूर आगार व्यवस्थापकाकडे केली आहेइस्लामपूर आगार व्यवस्थापकाकडे श्री खान यांनी सदरची बस चालू करावी अशी मागणी केली आहे निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की आवाटी येथील हजरत वली चांद पाशा हा दर्गा राज्यभरात प्रसिद्ध असून या दर्ग्याच्या दर्शनासाठी इस्लामपूर परिसरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात या दर्ग्यावर वर्षभरात मोठे असे तीन धार्मिक कार्यक्रम होत असतात या धार्मिक कार्यक्रमात सामील होण्यासाठी इस्लामपूर, सांगोला, पंढरपूर, मिरज, जत, कुर्डूवाडी, सांगली अशा परिसरातील अनेक भक्तगण या दर्ग्यावर हजेरी लावतात शिवाय याच बसने सदरचे प्रवासी कार्यक्रम आटोपून परत इस्लामपूरला जात असतात इस्लामपूर परिसरात हजरत वली चांद पाशा यांचे अनेक शिष्य गण आहे सदरचे शिष्य गण बाबाच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने दर्ग्यावर उपस्थिती लावतात त्यामुळे इस्लामपूर आवाटी ही बस त्वरित चालू करावी व भक्तगणांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी श्री खान यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे