शहर

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जावेद बाबा तांबोळी यांचा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सत्कार

उपसंपादक —–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 876 448

शिवछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्षपदी इयत्ता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्रभर चालू असलेल्या संवाद यात्रेनिमित्त पुरुषोत्तम खेडेकर हे अकलूज येथे आले होते

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे , मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मीनाक्षी जगदाळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ रामचंद्र मोहिते, संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ मानोरामा लावंड मॅडम,

माजी अध्यक्ष वनिता कोरटकर, तालुका कार्याध्यक्ष निनाद पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल माने, अजित माने,डॉ विश्वास कदम डॉ भोसले, डॉ विठ्ठल कोडग, डॉ बापू सणस, सौ शमा जगताप, माळशिरस,करमाळा,पंढरपूर, या तालुक्याचे सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य, अकलूज शहर विभागातील जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी, बहुजन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button