लोकसभेसाठी दोन व विधानसभा सभेसाठी दहा जागा सोडण्याची आठवले गटाची मागणी

बी टी शिवशरण
येत्या लोकसभेला दोन व विधानसभेसाठी दहा जागा सोडण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने भाजप कडे केली आहे आज शिर्डी येथे राज्यकार्यकारिणी च्या झांलेल्या बैठकीत एकमताने ठराव झाला त्याठरावात ही मागणी करण्यात आली उद्या शिर्डी येथे राज्यस्तरीय महा अधिवेशनहोत आहे

अधिवेशनाच्या पुर्व संधेला राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले कीं आगामी निवडणुका भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिव सेनेबरोबर युतीत राहून लढल्या जातील महिलांना ३३/टक्के जागा सोडण्याची त्यांनी मागणी केली तसेच राज्यातील गायरान जमिनी पाच एकर दलित भटके इतर मागास घटकांना कसण्यासाठी देण्याची मागणी ठरावात केली असल्याची माहिती आठवले यांनी दिली
कन्याकुमारी येथे भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याची मागणी त्यांनी केली उद्या होणाऱ्या महा अधिवेशन साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित रहाणार आहेत शिर्डी येथील महा अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित रहातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली



