सफाळे माकुणसार येथे भर रस्त्यात वडाचे झाड पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा….. मनसे कार्यकर्त्यांमुळे वाहतूक सुरळीत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे माकुणसार येथील भर वाहतुकीच्या रस्त्यावर वादळी पावसामुळे शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान वडाचे झाड पडले होते.
हे वडाचे झाड भर रस्त्यात पडल्यामुळे मुंबई महामार्ग एडवण आणि पालघर यांना जोडणाऱ्या माकुणसार रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

याबाबतची बातमी या भागातील वाहतूकदारांनी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष तथा विलंगी गावचे उपसरपंच व वाहतूक सेना पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चेतन पाटील यांना भ्रमणध्वनी वरून खबर दिल्यावर त्यांनी त्वरित त्यांचे मनसे कार्यकर्ते आगरवाडी शाखा अध्यक्ष मयूर पाटील व अन्य कार्यकर्ते यांची टीम त्यांचा स्वतःचा जेसीबी घेऊन हे रस्त्यात पडलेले वडाचे झाड त्वरित बाजूला करून मुंबई महामार्गाला जोडणारी वाहतूक सुरळीत करून दिली आहे.



