महाराष्ट्र

गणेशोत्सवा अगोदर खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी – माजी आमदार राजेश पाटील यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था पावसामुळे पडलेले खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेश पाटील यांनी नवनियुक्त आयुक्त सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीत त्यांनी गणेशोत्सवा अगोदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी विशेषतः खालील रस्त्यांवरील खड्ड्यांचे संदर्भ दिले आहेत:
बापाने फाटा – नायगाव रेल्वे स्टेशन
सातिवली हायवे – वसई रेल्वे स्टेशन
विरार फाटा – विरार स्टेशन
सोपारा फाटा – नालासोपारा स्टेशन
वालीव फाटा – वालीव गाव
संतोषभवन – गावराईपाडा
आदिवासी पाड्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते
…आणि इतर प्रमुख मार्ग.
पाटील यांनी सांगितले की, “रस्त्यांची ही अवस्था नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असून, विशेषतः वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी व कामकाजासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवात लाखो भाविक रस्त्यावर येतात त्यामुळे वेळेत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना प्रचंड गैरसोय होणार आहे.”

या बैठकीत वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत असा आग्रह माजी आमदार राजेश पाटील यांनी यावेळी केला.
या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे सातिवली विभागाचे माजी नगरसेवक सुनिल आचोळकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button