विशेष

साखर कारखाने बंद होऊन महिना झाला, अद्याप ऊसबिले नाही जनशक्ती आंदोलनाच्या पवित्र्यात; करमाळा तहसीलदारांना दिले निवेदन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

करमाळा तालुका व परिसरातील कारखाने बंद होऊन महिना उलटून गेला. तरीही शेतकऱ्यांच्या उसाची बिले मिळाली नाहीत. एफ आर पी कायद्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा रोख स्वरूपात उसाचे बिल देणे बंधनकारक असताना तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई, भैरवनाथ विहाळ, हिरडगाव, हळगाव अधिकारखान्यांनी अद्याप बिली दिले नाहीत. या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिर, संगोबा येथे जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवत करमाळा तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

या बैठकीमध्ये ७४ गावातील शेतकरी एकत्र आले होते. या गावांमध्ये तालुक्याशेजारी सर्वच साखर कारखाने यांच्या ऊसतोड टोळ्या होत्या. ज्यामुळे या करमाळा शेजारील गावांचा सर्वच साखर कारखान्यांना या उत्पादकांनी ऊस दिला आहे. ऊस दर एफ आर पी नुसार आणि 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना कारखाने बंद होऊन महिना उलटला तरी देखील डिसेंबर – जानेवारी या महिन्यात गेलेल्या उसाचे बिल कोणत्याही कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. म्हणून सर्वच शेतकरी हतबल झाले आणि जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांना विनंती करून आज बैठक घेण्याचे विनंती केली आणि ठरल्याप्रमाणे आज बैठकीला सर्वच गावांमधून प्रत्येक शेतकरी आला होता.

यामध्ये पुढील दिशा ठरली. ऊस बिल कशी मिळवायची याची योजना ठरली, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाऊ म्हणतील तसं कुठल्याही आंदोलनाचा पवित्रा घ्या आम्ही आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिथे उपलब्ध असेल. असेही शेतकऱ्यांनी सांगितले.त्यानुसार करमाळा तहसील येथे सदर आंदोलनाचे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक करमाळा आणि माननीय तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले.

यावेळी जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी तुमच्या कामाचा पैसा ,कष्टाचा पैसा ,प्रामाणिकपणाचा पैसा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही उपस्थित शेतकरी वर्गाला दिली. यावेळी दक्षिण वडगावचे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन काळे, मांगीचे बागल सर, बालाजी तरंगे, दादासाहेब गायकवाड, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, नयन मस्के, बिबीशन शिरसाट, शरद एकाड, भाऊसाहेब जाधव, मंगेश बदे,अभिषेक राऊत,जयसिंग घाडगे ,पप्पू ढवळे, नाना भोगल, भरत नलावडे, साहेबराव विटकर, अजित सय्यद,वैभव मस्के.राजाभाऊ मल्लाव,अशोक नगरे,गणेश वायभासे ,भोसले चेअरमन,शिवाजी शिंदे आणि ७४ गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button