शहर

पालघर अल्याळी तलाठी महेशकुमार कचरे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत


खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पालघर अल्याळी तलाठी महेशकुमार कचरे यांना सोमवारी दुपारी अँटी करप्शन ब्युरो पालघर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या पथकाने रंगेहात अटक केले आहे.

(33)वर्षीय तक्रारदार यांनी पालघर येथे खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी पालघर अल्याळी तलाठी महेश कुमार जनार्दन कचरे वय वर्ष (46)त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी यासाठी 15 हजार रुपये लागतील अशी मागणी केली. याबाबत (33) वर्षीय जमीन मालक (तक्रारदार) यांनी या तलाठ्याची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक श्री. सुनील लोखंडे(ठाणे परिक्षेत्र) व श्री.अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक (ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवलदार विलास भोये, योगेश धारणे, संजय सुतार,निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दीपक सुमडा या पथकाने सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी अडीच वाजता सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारून पोलिसांची चाहूल लागतात पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या पालघर अल्याळी तलाठी महेश कुमार कचरे यांचा पाठलाग करून या पथकाने त्यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button