माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही भाजपा साठी जातीय ध्रुवीकरण आणि मराठा नेत्यांतील अंतर्गत संघर्ष याने कठीण मार्गावर ,,,,,

अकलूज प्रतिनिधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न 9960178213
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही अतिशय रंजक होणार आहे , व ती तितकीच गुंतागुंतीची ठरणार आहे , महादेव जी जानकर साहेब माढा मधून उभे राहिले तर धनगर समाज हा त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर वर्गीकृत होईल असेच दिसत आहे , उत्तम राव जानकर यांनी कितीही दावा केला तरी ते धनगर समाजाची मते आत्ता महादेव जानकर यांचे विरोधात फिरवू शकत नाहीत असे चित्र स्पष्ट होत आहे , समाज नेता म्हणून त्यांची पकड समाजावर राहिलेली नाही , या सर्वाचा परिणाम म्हणून आज पर्यंत भाजप चां जो “माधव “पॅटर्न अस्तित्वात होता त्यातील धनगर हा निघून गेला आहे , मराठा आरक्षण लढा हा ही गुंतागुंती चां बनत चालला आहे , राज्य सरकारने दिलेले 10%मराठा आरक्षण आज हाय कोर्टात जनहित याचिका द्वारे आव्हानीत करण्यात आले आहे , मराठा आंदोलन कर्त्या ची मूळ मागणी म्हणूनच थेट ओबीसी मधून मराठा समाजा ला आरक्षण देण्याची होती व त्याचा आधार म्हणून मराठा समाज हा शेतकरी वर्ग असून” शेती कसणारा तो कुणबी”अशी सरळ व्याख्या त्यांनी केली होती , ओबीसी आरक्षण हे सामाजिक मागासलेपण आधारे नीच्छित केले जाते , व मराठा समाज हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मागास नाही असे सुप्रीम कोर्टाच्या निरिक्षणातून आणि निकालातून स्पष्ट झाले असताना माळी , वंजारी , धनगर आदी जाती चां समावेश कसा झाला? ते सामाजिक दृष्ट्या खरोखर मागास होते काय? मराठा व त्यांच्यात गुणात्मक फरक काय? करोडो मराठा हे दारिद्रय रेषेखाली जीवन जगत असताना मूठभर मराठा राज्यकर्त्यांच्या आधारे बहुसंख्य मराठा समाजाला न्याय का नाकारला जातोय? या व अश्या प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मराठा समाज शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मागत आहे काल च सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावात मराठा समाजाने भाजप नेत्यांना गाव प्रवेशबंदी केली आहे तर संभाजी नगर भागात केंद्रीय गृहमंत्री अमित जी शहा यांच्या आगमना प्रीत्यर्थ लावलेले पोस्टर मराठा युवकांनी फाडून टाकले आहेत , ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांच्या मागे नवबौध्द समाज मोठ्या प्रमाणावर वर्गीकृत होत असल्याने याचा तोटा महाविकास आघाडीला च बसेल हे एक तर्फी अनुमान आहे , भाजपला पाठिंबा दिलेल्या ना रामदास आठवले व प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या पारड्यातून ही संख्या वजा होत आहे व ही बाब सुद्धा भाजप ची मते कमी करू शकते , महाविकास आघाडीचे पुरोगामी मताचे टकरीसाठी ” हिंदुत्व वादाची उभी केलेली एकजूट जात ध्रुवीकरणाच्या खडकावर आदळल्याने भाजपची नौका क्षती ग्रस्त झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी मधून आलेल्या स्ट्राँग मराठा नेत्यात राजकीय युद्ध सुरू झाल्या चे चित्र माढा लोकसभा मतदार संघात दिसत आहे , आणि या सर्वाचा परिणाम म्हणून माढा लोकसभा निवडणूक एक तर्फी सुखा सुखी गुलाब जामुन सारखी भाजपचे तोंडात विरघळेल व भाजपचे तोंड गोड करेल अशी स्थिती मला तरी वाटत नाही ,,,,,,,!



