महाराष्ट्र

अकलूज नगर परिषद हद्दीतील टिळेकर वस्ती ते शंकर महाराज मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी.

अकलूज(प्रतिनिधी) लक्ष्मीकांत कुरुडकर.

अकलूज नगर परिषद हद्दीतील जाधव वस्ती ,टिळेकर वस्ती ते शंकर महाराज मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी उषाताई विलासराव टिळेकर आणि अन्य पाच जणांनी निवेदनाद्वारे अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे केली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून तसेच सामाजिक कार्यकर्ते साजिद भाई सय्यद यांच्या मागणीनुसार अकलूज नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 70 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामध्ये जाधव वस्ती ते टिळेकर वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण साठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत

मात्र जाधव वस्ती ते टिळेकर वस्तीपर्यंतच हा रस्ता मंजूर झाला असून पुढे शंकर महाराज मंदिरापर्यंत अंदाजे 900 मीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा अशी मागणी उषाताई टिळेकर, विजयकुमार नेवसे, अरविंद जाधव, विजयकुमार जाधव ,सुरेश शिवरकर ,यांनी स्वाक्षरीनिशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे शिवाय सदरच्या रस्त्यावर पावसाळ्यात कच्चा रस्ता असल्यामुळे ये जा करणे खूप अडचणीचे व जिकरीचे होत आहे या शंकर महाराज मंदिराच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे मागील 5 वर्षापासून केली जात आहे मात्र टिळेकर वस्तीपर्यंतच रस्ता मंजूर झाल्याने शंकर महाराज मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button