शैक्षणिक
सुहानी श्रीमंत पडळकर बारावी सी.बी.एस.इ.बोर्ड परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
- पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथील श्रीमंत अंकुश पडळकर (सर) यांची कन्या सुहानी पडळकर या विद्यार्थिनीने सी.बी.एस इ.बोर्ड बारावी परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच विद्यालयाचे डॉ. कदम व सौ. कदम मॅडम, प्रिन्सिपल व सर्व शिक्षक यांनीही त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.
पडळकर कुटुंबात 96% टक्के गुण मिळवणारी पहिलीच विद्यार्थीनी आसल्यामुळे सर्व स्तरातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने व इंदापूर तालुक्यातून कौतुक करून शाब्बासकी दिली जात आहे. पिंपरी बुद्रुक येथील श्रीमंत अंकुश पडळकर हे चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कन्येने बारावीत उत्कृष्ट रित्या चांगले गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंदापूर येथील कदम गुरुकुल विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. श्रीमंत पडळकर सर यांचे डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर व चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.




