केळवा सागरी पोलीस ठाणे व पालघर महसूल विभागाची संयुक्त कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी आणि नदीपात्रांचे नुकसान टाळण्यासाठी अवैध रेती आणि वाळू उपसावर कडक निर्बंध व बंदी लागू करून मुंबई उच्च न्यायालयाने अवैध वाळू उपसा थांबविण्याचे आदेश दिले असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली करून केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दातिवरे खाडीतून अवैधरित्या वाळू उपसा करणारी एक बोट व सेक्शन पंप यांच्यावर केळवा सागरी पोलीस ठाणे व पालघर महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या शनिवार दिनांक 9 मे रोजी कारवाई करून रेतीने भरलेली एक लाकडी बोट जागीच जाळून एक सेक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने कापून नष्ट केला आहे.
त्याचबरोबर या बोटीतील 20 ब्रास वाळू समुद्रात सोडण्यात आली आहे.सदर कारवाई केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, पालघर महसूल विभाग आगरवाडी सर्कल तेजल पाटील, उसरणी सजा तलाठी ज्योती गंभीरे, महसूल कर्मचारी , व नौका विभाग गस्त पोलीस उप निरीक्षक बारी, पोलीस शिपाई जयदीप सांबरे, व केळवा सागरी पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे



