महाराष्ट्र
अत्यंत गरजू अश्या नऊ जोडप्यांचे पारंपरिक पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा संपन्न

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संगमनगर येथे धरतरी मंदिरात अत्यंत गरजू अश्या नऊ (९) जोडप्यांचे पारंपारीक पद्धतीने धवलेरी महिलांनी लग्न लावले. या सामूहिक विवाह सोहळा चे वैशिष्ट्य म्हणजे लग्न लावण्याचा सर्व विधी हा महिलांनी पार पडला.

धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था, वनवासी कल्याण आश्रम,महाराष्ट्र, प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने विक्रमगड धरतरी माता मंदिर संगमनगर, विक्रमगड येथे या सामूहिक विवाह सोहळाचे आयोजन केले होते.

या जोडप्यांना संसारिक साहित्य भेटवस्तू, केशर आंब्याचे कलम देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद समस्त समाज बांधवांनी दिले. सांगड , तूर वाद्याचा व भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.




