महाराष्ट्र

बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्याने टणूकरांचा जिव पडला भांड्यात, प्रशासनाने सोडला सुटकेचा सुस्कारा.
पुणे ग्रामीण व शहर बाॅम्ब शोध पथकाची सयुक्तीक कार्यवाहीत ती वस्तू स्फोट करून नष्ट केली

इंदापूर, प्रतिनिधी, एस. बी. तांबोळी

निरा आणि भिमा नदिच्या खोऱ्यातील टणू ( ता. इंदापूर ) गावात बॉम्बसदृश्य वस्तूने दोन दिवस एकच खळबळ माजवली. अखेर पोलिसांसह बॉंबशोध पथकाने स्फोट घडवत या वस्तुचा नाश केल्याने टणू गावासह परिसरातील नागरिकांनी व दोन दिवस चिंतेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
सोमवारी १३ फेब्रुवारीला टणु येथील शेतकरी दत्तात्रय तुळशीराम मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हि वस्तू निदर्शनास आल्या नंतर मोहिते यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना कल्पना दिली होती. पोलिसांनी घटनस्थळी तातडीने धाव घेतली. इंदापूर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथकाशी संपर्क करून पथकाला पाचारण केले. संध्याकाळी पथक टणू गावात दाखल झाले होते. दरम्यान श्वान पथकाने देखील या वस्तूला बॉम्ब असल्याचा संकेत दिल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर संपूर्ण तपास करून पुणे शहर आणि ग्रामीण बीडीडीएस च्या पथकाच्या मदतीने ती संशयास्पद वस्तू मंगळवार दि. १४ रोजी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी स्फोट करून निकामी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला लोकांनी देखील या कार्यवाहीत प्रशासनाने दाखवलेल्या तत्परते मुळे समाधान व्यक्त केले.
दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी सोमनाथ लांडे, पोलीस आरिफ चाँदसाहेब सय्यद, विकास राखुंडे, सुरेंद्र वाघ, हवालदार विरभद्र मोहळे, सचिन बोराडे, राकेश फाळके, समाधान केसकर, विनोद काळे, शुभांगी खंडागळे आदींजण घटनास्थळी तळ ठोकून होते.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
जरी ही बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी केली असली तरी या ठिकाणी ती आली कशी? या पाठीमागील उद्देश काय? आणि तो कोणी आणला? यासारखे अनेक प्रश्न आता पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहेत. त्याची उत्तरेही पोलीस यंत्रणेला मिळवावी लागणार आहेत.”
:- तपासणीसाठी अवशेष प्रयोग शाळेत पाठविणार ..
शेतकरी दत्तात्रय मोहिते यांच्या शेतात बॉम्बसदृश्य वस्तू संशयास्पद असल्याने पुणे ग्रामीणच्या बाॅम्ब शोधक पथकाला बोलविले. पथकाने त्याची पाहणी केल्यानंतर ते स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले. त्यास सुरक्षित स्थळी नेऊन त्याचा स्फोट घडवत ते नष्ट केले. स्फोटानंतर त्याचे जे अवशेष आहेत ते ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दिलीप पवार – पोलीस निरीक्षक इंदापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button