महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धा-२०२३आढावा बैठक संपन्न

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर-अकलूज, स.म.शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व महाशिवरात्री यात्रा महोत्सव शंकरनगर-अकलूज यांच्या च्या संयूक्त विद्यमाने १७,१८,१९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘शिवतिर्थ आखाडा’ शंकरनगर-अकलूज येथे ४४ व्या अखिल भारतीय ‘त्रिमूर्ती कुस्ती चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेची आढावा बैठक जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूजच्या अध्यक्षा . स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, यूवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत स्पर्धेच्या तयारी व नियोजनाबाबत स्पर्धा प्रमूख वसंतराव जाधव, अरविंद वाघमोडे, उमेश भिंगे, दादा कोकाटे यांनी स्पर्धा नियोजनाची माहिती सादर केली.
.मदनसिंह मोहिते पाटीवा,यांनी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनमोल मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर शिवतिर्थ आखाडा येथे आखाड्याची पाहणी करून त्यांनी स्पर्धेच्या पूर्व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. स्वरुपाराणी (दिदी)व मा. सयाजीराजे यांनीही आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले.

या बैठकीस स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक पै..रावसाहेब मगर, भिमराव काळे, मंडळाचे सचिव पोपटराव भोसले-पाटील, संचालक, नियोजन प्रमुख, सदस्य, पत्रकार कृष्णा लावंड,शिवाजी पालवे, राजीव लोहकरे, संतोष भोसले, शशिकांत कडबाने, नरेंद्र धूमाळ उपस्थित होते.




