विशेष

बागवान राहत फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्याची वार्षिक सर्व साधारण सभा सोलापूर येथे संपन्न…

🎯 संस्थेच्या संचालक मंडळात प्रथमच सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सातारा येथील तरन्नूम बागवान यांना संधी देण्यात आली…

विशेष प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज

नव्याने स्थापन झालेल्या बागवान राहत फाऊंडेशन ची वार्षिक सर्व साधारण सभा सोलापूर येथील संस्थेच्या कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,सभेच्या अध्यक्ष स्थानी जे के बागवान होते…

सभेच्या सुरुवातीला सचिव सादिकअली बागवान (सातारा) यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणांच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष जे के बागवान यांच्या मातोश्री आणि संस्थेचे संचालक जावेदभाई बागवान (अक्कलकोट) यांच्या अकाली निधना बद्दल शोक व्यक्त करत “भावपुर्ण श्रध्दांजली” अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला…

तदनंतर सर्व संचालक मंडळाच्या ओळख परेड नंतर संस्थेचे कामकाज कसे राहील आणि संचालक मंडळाने ती कामे समाज बांधवां पर्यंत कसे पोहचवायचे यावर चर्चा करण्यात आली…

काल दिवसभर दोन टप्प्यात झालेल्या या वार्षिक सर्व साधारण सभे मध्ये बागवान राहत फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेचे रितसर बँक खाते काढण्यात आले,या मध्ये सर्व संचालक मंडळाने अध्यक्ष,सचिव आणि खजिनदार यांना संस्था व्यवहाराचे अधिकार देण्यात आले…

बागवान राहत फाऊंडेशन या संस्थेची स्थापना झाले नंतर काहीं दिवसांनी संचालक असलेले जावेद बागवान (अक्कलकोट) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर पहिल्यांदाच सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या तरन्नूम बागवान यांची बहुमताने निवड करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला…

या वेळी संस्थेचे सचिव सादिकअली बागवान (सातारा) यांनी सबंध संचालक मंडळाला येत्या सहा महिन्याचे कामकाजाचा लेखजोगा सादर केला आणि प्रत्यक्षात संबंधित काही कामे हि तातडीने अमलात आणावी अशा सूचना सर्व संचालक मंडळाला देण्यात आल्या…

गुरुवार दिनांक 17/07/2025 रोजी 406, बेगम पेठ,सोलापूर येथे झालेल्या या वार्षिक सर्व साधारण सभे साठी संचालक मंडळा सह अजित दादा पवार गटाचे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीरभाई इनामदार यांच्या सह रि पोलीस निरीक्षक इनामदार साहेब (सातारा) हे आपल्या धर्मपत्नी रेश्मा इनामदार यांच्या सह उपस्थित होते…

आपल्या अध्यक्षीय भाषणात जे के बागवान यांनी संस्थेचे आत्ता पर्यंतचे कामकाज सुरळीत सुरू असुन संचालक मंडळाने असेच सहकार्य केल्यास बागवान राहत फाऊंडेशन हि संस्था अल्पावधीतच सबंध महाराष्ट्रात आपली कक्षा रुंदावणार असल्याचे मत व्यक्त केले…

सदर वार्षिक सर्व साधारण सभे साठी सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरैया बागवान देखील आवर्जुन उपस्थित होत्या,या सभे साठी बिलाल बागवान,इरफान बागवान (मंगळवेढा)रौफ बागवान,आसिफ बागवान (बन्सीलाल) यांच्या सह संस्थेचे बहुतांश संचालक मंडळ उपस्थित होते…

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेचे आभार प्रदर्शन संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख आमीर मोहोळकर यांनी व्यक्त केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button