अकलूज पोलीस ठाणे चे कर्तव्यदक्ष हवालदार व पोलिस मिञ परिवाराचे जनक रमेश सुरवसे -पाटील यांचे हृदयविकाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्युज
अकलूज पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार व संपूर्ण राज्यभर मोठा विस्तार असलेल्या पोलीस मित्र परिवार चे संस्थापक अध्यक्ष रमेश नामदेव सुरवसे -पाटील (वय 53वर्षे )यांचे 10मार्च रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
अकलूज पोलीस ठाणे येथे येथे हजर झाल्यापासून त्यांनी अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबविले,
पोलीस मित्र परिवार च्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क वाढविला होता. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केले .पोलीस मित्र परिवार च्या वतीने साजरा करण्यात आलेल्या परवाच द्वितीय वर्षाचा “नो कम्प्लेंट डे ” साजरा करुन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केले असुन राज्यातील पोलीस दलात त्यांनी एक आगळा -वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांनी ‘अकलूज पोलीस ठाणे’ च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. सायबर क्राईम, पोलीस पाटील, पत्रकार समन्वय, मुली, महिला सुरक्षा साठी शिबीर, तसेच इतर ही अनेक विषयावर विविध शिबीरे घेऊन त्यांनी समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट काम केले.
पोलिसाबाबत सर्वा सामान्य नागरिका मध्ये जो समज होता तो त्यांनी पोलीस आणि नागरिक यांच्या नात्यात एक वेगळेपण आणले.परिसरातील एखादा नागरिक फिर्याद घेऊन आला की, त्याला बाजूला घेऊन त्याला प्रबोधन करुन सांगत असत कि बाबारे फिर्याद देऊ नको. कशाला उगीच पोलिसांना त्रास, कोर्टात हेलपाटे, पैशाचा अपव्यय ,वेळ वाया घालवणे , शिवाय आपसात कायम वैर निर्माण करण्याचे काम तु करु नको ,असे म्हणत अगदी चुटकी सरसी त्याची अडचण दूर करीत होते.
आणि परस्पर विरोधी दोघांनाही समजावून त्यांच्या मध्ये समेट घडवून आणण्याचे कार्य त्यांनी अगदी मनापासुन केले शिवाय आपल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते सतत दक्ष राहत होते.
आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
सर्व स्तरातील नागरिकां बरोबर त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते. आपले कर्तव्य बजावत असतानाच सामाजिक सलोखा अबाधित राहावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असायचे. शेवटी “जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला ” या प्रमाणे ईश्वराला जे मान्य आहे ते कोणीही टाळू शकत नाही . अतिशय शांत, मनमिळाऊ, व सतत हसतमुख असलेले रमेश सुरवसे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात 10मार्च रोजी संध्याकाळी 8-40वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांनी अश्रुपूर्ण नयनानी अखेरचा निरोप दिला तसेच पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,चार भाऊ, तीन बहिणी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान त्यांच्या तिसऱ्याचा(सावडण्याचा )विधी 12मार्च रोजी सकाळी अकलाई स्मशानभूमी येथे होणार आहे.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



