सामाजिक

श्री. लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरुकुल मध्ये विद्यार्थी संस्कारक्षम व वारकरी शिक्षण अध्ययन करतील – श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी

अध्यात्मिक गुरूकुल संस्था संस्कारक्षम विद्यार्थी घडवतील व वारकरी शिक्षणाचे अध्यायन करतील. संगीताला जीवनामध्ये फार महत्व आहे. संत तुकाराम महाराज यांना संगीत फार आवडायचे . या संगीत विद्यालयामधुन अनेक विद्यार्थी विषारद व कलेमध्ये नैपुण्य मिळवतील असे प्रतिपादन श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज यांनी केले.
नीरा नरसिंहपूर येथील श्री. लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुलच्या (प्रतिष्ठान) इमारत बांधकाम भुमीपुजन संत तुकाराम महाराजांचे ९ वे वंशज श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. नीरा नरसिंहपूर येथे ह.भ.प अंकुश रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल मार्फत भक्त प्रल्हाद संगीत विद्यालय चालू आहे. तसेच वारकरी शिक्षण संस्था जुन २०२३ पासुन चालू होणार आहे. याप्रसंगी ह.भ.प.आनंद काकडे महाराज, संगमचे नुतन सरपंच नारायण ताटे देशमुख यांचे हस्ते श्रीगुरू बापुसाहेब देहूकर महाराज, चंद्रकांत काकडे काका, आनंद काकडे महाराज, प्राचार्य रवि काकडे सर, उपसरपंच सौ.रेणुका काकडे व कुटूबीयांचा सन्मान करण्यात आला.
जागा देण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल वसंत घाडगे व कुटूंबीय तसेच ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक गणेश लंबाते, महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात भक्त प्रल्हाद संगीत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनीं अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई परीक्षेत चांगले यश संपादन केल्याबद्दल प्रशिस्तपत्रक तसेच ग्रंथपाल सौ. दुनाखे मॅडम यांनी दिलेल्या कंपासपेटी देऊन श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज, चद्रकांत काकडे काका, नारायण ताटे देशमुख, विजय सरवदे, सुर्यनारायण दंडवते, शितल मोहीते यांचे हस्ते करण्यात आला. तसेच गणेशगांवचे सरपंच किसन नलवडे यांनी इमारत बांधकामासाठी रुपये २१०००/-₹ ची देणगी देण्याचे जाहीर केले. नीरा नरसिंहपूरच्या लक्ष्मी नृसिंह मंदिराचे मुख्यपुजारी वेदमुर्ती वेदाचार्य नंदकुमार (ज्ञानेश्वर) डिंगरे यांनी २५०००/-₹ ची देणगी इमारत बांधकामासाठी जाहीर केली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दशरथ राऊत यांनी ग्रामपंचायतच्या वतीने एकमताने ठराव करून ही जागा अध्यात्म मंडळास दिली आहे. अध्यात्म गुरूकुल मधील चार मुली दत्तक घेणार आहे. आनंद महाराज काकडे यांनी संस्थेस एक खोली देण्याचे जाहीर केले. बापुसाहेब देहुकर महाराज यांनी संस्थेतील चार विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली. लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट यांनी संगीत विद्यालयासाठी हार्मोनीयम पेटी, पखवाज, तबला, २५ टाळ, वीणा, मोठ्या दोन सतरंजी देऊन सहकार्य केले आहे. तसेच विकास व उत्कर्ष मंडळ यांनी नोटरी कराराने जागा दिली आहे.
संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प अंकुश रणखांबे महाराज यांनी ही संस्था पंचक्रोशीची आहे सर्वांचे सहकार्याने ही लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक भवन उभारत आहे. श्रीगुरू बापुसाहेब देहुकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने वारकरी शिक्षण संस्था चालू करून निवासी विद्यार्थी ठेवत आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी केले. आभार डाॅ. अरूण वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह.भ.प महादेव ताटे देशमुख, बाबुराव गव्हाणे, डाॅ.अरूण वैद्य, वसंत घाडगे, गणेश चोपडे, नारायण मस्के, ह.भ.प आनंद काकडे महाराज यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button