शहर

काझी गल्लीत चालू असलेले सार्वजनिक शौचालयाचे काम त्वरित थांबवावे – राष्ट्रवादी काँग्रेस

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज : काझी गल्ली येथील बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे आणि ते काम इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड,सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे,सामाजिक कार्यकर्ते सलीम तांबोळी,सचिव तुकाराम साळुंखे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे, पत्रकार मोहसिन शेख, कमाल शेख,सरफराज बागवान,इत्यादी उपस्थित होते.

अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून काझी गल्ली येते सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सदर कामाला त्या ठिकाणच्या जनतेमधून विरोध होत असल्याने आणि त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात येऊ नये अशी अनेकांची भावना असल्याकारणाने नगरपरिषदेने ते काम इतरत्र हलवून त्याचा आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधावे अशी मागण करण्यात आली आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने नगरपरिषदेकडून तात्काळ कार्यवाही न झाल्यास नगर परिषदेच्या विरोधामध्ये 10 फेब्रुवारी 2023 रोजी अकलूज नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपात हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button