क्रीडा

आरसीबीचा ऐतिहासिक विजय: 228 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

आयपीएल 2025 च्या 70व्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आज, 27 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जबरदस्त खेळी साकारली. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या.

ऋषभ पंतने 61 चेंडूंमध्ये नाबाद 118 धावांची आतषबाजी करत एलएसजीला मोठा टार्गेट उभा करुन दिला. त्याला मिचेल मार्शने 37 चेंडूत 67 धावांची जोरदार साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली.

आरसीबीचा यशस्वी धावांचा पाठलाग

228 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. फिल साल्टने 30 आणि विराट कोहलीने 54 धावा करत धावसंख्या उचलून धरली. मात्र खऱ्या अर्थाने सामना जिंकला तो जितेश शर्मा आणि मयंक अग्रवालने.

जितेश शर्मा याने केवळ 33 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 85 धावा फटकावत सामना आरसीबीच्या खिशात टाकला. त्याला मयंक अग्रवालने 41 धावांची साथ दिली आणि दोघेही नाबाद परतले.

आरसीबीचा ऐतिहासिक रेकॉर्ड

हा विजय आयपीएलमधील आरसीबीसाठी ऐतिहासिक ठरला. कारण 228 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोच्च यशस्वी धावांचा पाठलाग केला. यापूर्वी आरसीबी केवळ दोन वेळाच 200+ धावांचे लक्ष्य पार करू शकली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button