महाराष्ट्र

पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात टाइम्स 9 च्या वाचकांसाठी माहिती…

🎯 टाइम्स 9 न्यूज घेणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पूर्वीचा आढावा…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक लॉर्ड रिपन (Lord Ripon) आहेत.त्यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) सुरू केले.त्यामुळे त्यांना या क्षेत्रात केलेले योगदान लक्षात घेऊन “जनक” (Father) म्हणून ओळखले जाते…

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय आणि त्या कोणत्या आहेत,हे खालीलप्रमाणे :

स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government)

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे राज्य सरकारकडून अधिकृत केलेल्या आणि स्थानिक स्तरावर कामकाज पाहणाऱ्या संस्था.या संस्था जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर विकास साधण्यासाठी काम करतात…

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार

1. जिल्हा परिषद

हि जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे,जी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करते…

2. पंचायत समिती

तालुका स्तरावर काम करणारी संस्था,जी पंचायत समिती म्हणून ओळखली जाते…

3. ग्रामपंचायत

गाव स्तरावर काम करणारी संस्था,जी गावच्या विकासासाठी जबाबदार आहे…

4. महानगरपालिका

शहरांमध्ये काम करणारी संस्था,जी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी काम करते…

5. नगरपालिका,नगर परिषद आणि नगर पंचायत

लहान शहरांमध्ये काम करणारी संस्था,जी शहराच्या विकासासाठी काम करते…

स्थानिक स्वराज्य संस्था हे स्थानिक स्तरावर शासन आणि प्रशासन चालवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.या संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतात आणि स्थानिक स्तरावर विकास साधता येतो…

महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत,कारण जवळ जवळ सात आठ वर्षे पूर्ण होऊन देखील ह्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडल्या नाहीत…

2017 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या नसल्याने प्रशासकांनी आज पर्यंत सर्व काम काज पार पाडले असून या दरम्यान जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तिथे स्थानिक राजकारण मात्र ढवळून निघणार आहे…

ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक होण्यासाठी आत्ता पासूनच काहीं इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आपणा सर्वांना पहायला मिळत आहे परंतु खरी गंमत हि निवडणुका जाहीर झाल्या नंतर दिसून येणार आहे…

सद्य परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण,स्थानिक राजकारण,निवडणुकीला इच्छुक असणारे उमेदवार आणि प्रमुख पक्षांच्या हालचालींवर टाइम्स 9 न्यूज लवकरच आढावा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button