यशवंतराव चव्हाण यांच्या आजच्या जयंती दिना पर्यंत “कुठे नेऊन ठेवला आहे” आपला “पुरोगामी” महाराष्ट्र…

अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
आधुनिक महाराष्ट्राचे “शिल्पकार” यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती.आपल्या कणखर बाण्याने आणि नेतृत्वगुणांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय संरक्षणमंत्रीपद,गृह मंत्रीपद,अर्थ मंत्रीपद आणि उप पंतप्रधानपद भूषवणारे “लोकनेते” यशवंतराव चव्हाण यांनी फुले,शाहू,आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याची दिशा दाखवली.महाराष्ट्रातील राजकारणाला आदर्श मापदंड देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
कृषी,उद्योग,सहकार,शिक्षण,कला,साहित्य या सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवत महाराष्ट्राला दिशा देणारे स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सबंध राजकारणासाठी सदैव प्रेरणादायी राहील,स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या “उत्तुंग नेतृत्वाला” देखील जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन…
महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी कुणाच्या काळात झाली असेल तर ते होते स्व.यशवंतराव चव्हाण साहेब,परंतु तोच महाराष्ट्र आज पुरोगामी विचारां पासून दूर होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे…

आज महाराष्ट्रासाठी शेतकरी,कष्टकरी,कामगार,औद्योगिक,दळण वळण,विद्यार्थी,नोकरी विषयक,महिला बालकल्याण,आरोग्य आणि विविध विकास कामांच्या योजनावर चर्चा होणे गरजेची असताना कधी औरंगजेब तर कधी वाल्मीक कराड तर कधी खोक्या भोसले तर कधी कुंभमेळ्यातील पाणी,तर कधी हलाल मटण का झटक्याचे मटण या वर चर्चा होताना दिसत आहे…
अशातच सध्या महाराष्ट्र विधी मंडळात अर्थ संकल्पिय अधिवेशन सुरू आहे,जनतेच्या विकासाच्या मुद्द्याला आज कालचे शातीर राजकारणी लोक कशा प्रकारे बगल देत आहेत हे सबंध महाराष्ट्र मात्र मूग गिळून पहात आहे…
बीड जिल्हा तर बदमाशांच्या नावाने बदनाम झाला आहे याचे पंकजा मुंडे यांना काही देणं घेणं नाही पण त्या सुध्दा मंत्री मंडळातील सहकाऱ्यांना होळीच्या रंगाचे वाटप करण्यात व्यस्त असलेल्या दिसुन आल्या तर इकडे राणे पुत्र असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्या मध्ये मुस्लिम मावळे नव्हतेच,असे म्हणत अकलेचे तारे तोडले असे अनेक जाणकारांचे मत आले…
पुरोगामी विचारांचा प्रभाव असणारा आपला महाराष्ट्र आज अधोगती कडे जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्या मध्ये मुस्लिम मावळे होते का नव्हते हे इतिहासकार सांगतील हि परंतु सध्याच्या परिस्थितीत या विषयाचा सबंध महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे हे संबंधीत कॅबिनेट मंत्र्यांनी महाराष्ट्राला एकदा सांगून टाकावे…
राणे पुत्र यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ सबंध महाराष्ट्र वासियांची सेवा करण्यासाठी घेतलीय आहे का पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींना खुश करण्यासाठी घेतलीय हेच महाराष्ट्रातील जनतेला कळेना असे झाले आहे,आपल्या कडे मत्स्य पालनाचे जे खाते आलेले आहे त्या मध्ये लक्ष घातले तर समुद्र किनारा लाभलेल्या कोकण वासियांचा काही तरी फायदा होईल एवढे मात्र तितकेच खरे…
आत्ताच्या घडीला झालेल्या “औरंगजेब” या विषयाने काय साध्य केलंय कुणास ठाऊक परंतु बिन अकली असलेल्या अबु आझमीच्या तोंडून हा विषय कुणी बाहेर काढायला लावला हा मात्र संशोधनाचा विषय आहे,आपल्या कडील बोली भाषेत एक म्हण आहे “गाडलेले मुडदे कशाला उकरायचे” जरी औरंगजेबाची कबर उकरली तर तो त्यात सापडणार आहे का…? हा देखील संशोधनाचा विषय आहे,छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि जो पर्यंत चंद्र,सूर्य आहेत तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हेच सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवतच राहणार यात शंका असण्याचे कुणाचे कारण नाही…
कुंभमेळ्यातील पाण्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं तेच वक्तव्य दुसऱ्या कुणी केलं असतं तर सबंध महाराष्ट्रातून “खळ खट्याक” असे आवाज यायला जरा सुध्दा उशीर झाला नसता किंवा लागला नसता…
अशा वेळी मात्र “कुठे नेऊन ठेवला आहे आपला पुरोगामी महाराष्ट्र” हे वाक्य मात्र आठवल्या शिवाय राहत नाही…



