व्यसनाची होळी हा व्यसनमुक्त युवक संघाचा उपक्रम

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो. 9921500780
देशभरामध्ये व महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात युवा पिढी व्यसनाकडे झपाट्याने ओढली जात असताना व्यसनांची होळी हा व्यसनमुक्त युवक संघाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सराटी डिलीटचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केले. ते व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने अकलूज (ता. माळशिरस)येथे आयोजित ‘ व्यसनांची होळी – हीच खरी दिवाळी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले ते म्हणाले समाजाच्या आजच्या प्रमुख समस्या पैकी व्यसन ही महत्त्वाची समस्या आहे.

या व्यसनामुळे शारीरिक, मानसिक,आर्थिक व सामाजिक हानी होत आहे.अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील१६ वर्षापासून व्यसनांची होळी-हीच खरी दिवाळी हा अभिनव उपक्रम वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय,संस्था आणि मंडळामध्ये राबविला जातो.यावेळी तंबाखूजन्य पदार्थांच्या रिकाम्या पाकिटांची त्याचबरोबर घातक अशा थंडपेयांच्या बाटल्यांची मान्यवरांच्या वतीने होळी करण्यात आली.

या कार्यक्रमास माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अकलूज मराठा व्यावसायिक संघाचे गणेश महाडिक, इंद्रजीत नलवडे,केमिस्ट असोसिएशनचे शंकर पवार,रत्नदिप फडे,अमोल आडगावकर,आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विक्रम माने देशमुख,विजय जगताप, रवी जगताप, सागर कुतवळ यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार आयोजक योगशिक्षक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले.