महाराष्ट्र

आरोग्य विमा ही काळाची गरज : डॉ एम के इनामदार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज : पर्यावरण , प्रदूषण , वाढती महागाई , आरोग्य या सारख्या संकटाना माणसाला सामोरे जावे लागत आहे . कोणताही वैद्यकीय उपचार आता न परवडणारा झाला आहे . या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आरोग्य विमा ही काळाची गरज असून नागरिकांनी तो काढावा असे आवाहन प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ एम के इनामदार यांनी केले आहे.

अकलूज येथील डॉ एम के इनामदार यांच्या अश्विनी रुग्णालयात सालाबादप्रमाणे यंदाही माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली . त्याप्रसंगी आयोजित समारंभात डॉ एम के इनामदार यांनी आरोग्य विषयक माहिती दिली ..
डॉ इनामदार म्हणाले , आजही लोक दवाखान्याची पायरी चढायला नको म्हणतात त्याचे एकमेव कारण म्हणजे वैद्यकीय उपचार महागडे झाले आहेत . औषध , गोळ्या , वैद्यकीय साहित्य महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारे झाले आहे .

त्यामुळे माणूस वैद्यकीय उपचारापासून दूर जात आहे . या सर्वांवर एकच उपाय म्हणजे आरोग्य विमा . केंद्र सरकारने यामध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत . त्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा असे ते म्हणाले.यावेळी पत्रकार संघाच्या वतीने डॉ एम के इनामदार व डॉ अनिकेत इनामदार यांचा किरण जाधव व सूर्यकांत भिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

प्रास्ताविक पत्रकार रामभाऊ मगर यांनी केले तर आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले . माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी तालुक्यातील 50 पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
21:02