मुंबई मधील मराठीच्या अस्मितेसाठी मविसे मैदानात

आयुक्त भूषन गगराणी यांना किरण साठेंनी दिले निवेदन
कार्यवाही न झाल्यास मनपाच्या विरोधात आंदोलनाचा दिला इशारा
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात मुंबई शहरातील सर्व प्रसाधन गृह व स्नान गृहाचा ठेका मराठी नागरिकांना देण्यात यावा तसेच प्रसाधन गृहात मराठी नागरिकांनाच प्राधान्य देण्यात यावे आणि सद्या मुंबई शहरातील प्रसाधन गृह व स्नान गृहात काम करणाऱ्या परप्रांतीय लोकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यात यावे आणि त्याची परप्रांतातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासाण्यात यावी आणि प्रसाधन गृहात दराचे फलक लावण्यात यावेत.अशी मागणी केली आहे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे उपस्थित होते.मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व प्रसाधनगृह व स्नानगृह याचा परप्रांतातील लोकांना दिलेला ठेका रद्द करण्यात यावा आणि महाराष्ट्र राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये या प्रसाधनगृह आणि स्नानगृहाचा ठेका मराठी व्यवसायिकांना देण्याचा ठराव महानगरपालिकेमध्ये करण्यात यावा. प्रसाधन गृहामध्ये व स्नानगृहामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा कब्जा दिसून येत आहे.या प्रसाधन व स्नानगृहांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या व मुंबई शहरातून आलेल्या प्रत्येक नागरिकांना हिंदीमध्ये बोलण्याची शक्ती प्रसाधनगृह व स्नानगृहांमध्ये असलेल्या परप्रांतीय लोकांकडून करण्यात येत आहे.त्यांना मराठी भाषा येत नाही आपण हिंदीमध्ये बोला असे सांगतात हे दुर्दैवी आहे.असल्याचे निवेदनात पक्षप्रमुख किरण साठे यांनी नमूद केले आहे.परप्रांतातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात मुजोरी दिसून येत आहे.थोड्याच दिवसांत मुंबई मध्ये मराठी माणसाला राहणे व वागणे मुश्कील होईल यात शंका नाही असे मत साठेंनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्राचे आर्थिक राजधानी व महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या मुंबई शहरामध्ये मराठी भाषा लोप पावत अथवा संपत चालली आहे,मुंबई शहरामध्ये हिंदीचा उदय मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.या सर्व प्रकारामुळे मुंबई शहरातील सर्व प्रसाधनगृह व स्नानगृहांमध्ये काम करणारे जे परप्रांतीय कामगार आहेत,त्यांची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तपासण्यात यावेत तसेच हे ज्या राज्यांमधील किंवा ज्या परप्रांतातील असतील त्या प्रांतातील/ राज्यातील त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात यावी आणि या प्रसाधन गुहामध्ये आणि स्नानगृहामध्ये महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिकांनाच ठेका देण्यात यावा आणि मुंबईमध्ये परप्रांतीयांची चाललेली मुजोरी तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करून आंदोलनालाचा इशारा दिला आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्त्री,मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविल्या आहेत.