पत्रकार विजय घरत यांना पितृशोक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर
पालघर जिल्ह्यातील टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत यांचे वडील मधुकर बेंडू घरत यांचे 6 मार्च रोजी दुःखद निधन झाले.
मधुकर घरत हे पश्चिम रेल्वेत नोकरी करीत असताना 2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वतःच्या शेतात घालवले. शेतीवर अत्यंत प्रेम असणाऱ्या मधुकर घरत यांचे गुरुवार 6 मार्च 2025 रोजी शेतातच निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या कुटुंबावर, मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार 15 मार्च रोजी जलसार जेट्टी येथे करण्यात येईल. तर दिवस कार्य विधी सोमवार 17 मार्च रोजी सफाळे पश्चिमेकडील विराथन बुद्रुक (चाफेवाडी) येथील राहत्या घरी करण्यात येणार आहे.
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क समुहाच्या वतीने मधुकर घरतजी यांना भावपुर्ण श्रध्दांजली…