पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी माकुणसार गावातील जुगार अड्डयावर धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 11 जुगार्यांवर केली कारवाई
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीतील माकुणसार गावाजवळील ब्राम्हणदेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत खुलेआम तीन पत्ती जुगाराचा खेळ खेळणाऱ्या ११ जणांवर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी कारवाई केली असून या कारवाईत केळवा सागरी पोलिसांनी एकूण 5 लाख 96 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याने पालघर पोलीस एक्शन मोडवर आहेत . याच अनुषंघाने केळवा सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी त्यांच्या हद्दीतील कार्यक्षेत्रात दिवस रात्र पेट्रोलिंग सुरु केले आहे. गुरुवारी पहाटे 3. 00 वाजण्याच्या सुमारास टेंभीखोडावे येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.व या दरम्यान शुक्रवार 5 एप्रिल रोजी 11.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना केळवा सागरी पोलिसांनी माकूणसार गावाच्या हद्दीतील ब्राह्मणदेव मंदिरासमोरील रूपेश पाटील यांच्या घराच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनात आले.
यावर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके,पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलीस हवालदार जयदीप सांबरे या टीमने तात्काळ धाड टाकून ११ जणांना अटक केले.व त्यांच्या जवळील रोख रक्कम जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 5 लाख 97 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
याप्रकरणी केळवा सागरी पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम (12 अ) प्रमाणे 1) विपुल म्हात्रे,2)सागर पाटील,3)किशोर मोहिते,4) अनिल घरत,5) संजय पंडिया,6) प्रवीण पाटील,7) जैलेश पाटील,8) करण जाधव,9) सचिन वर्तक,10) संदीप पाटील,11) राजेश ठाकूर सर्व राहणार माकुणसार या अकरा जणांवर केळवा सागरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीतील माकुणसार गावाजवळील ब्राम्हणदेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत खुलेआम तीन पत्ती जुगाराचा खेळ खेळणाऱ्या ११ जणांवर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी कारवाई केली असून या कारवाईत केळवा सागरी पोलिसांनी एकूण 5 लाख 96 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याने पालघर पोलीस एक्शन मोडवर आहेत . याच अनुषंघाने केळवा सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी त्यांच्या हद्दीतील कार्यक्षेत्रात दिवस रात्र पेट्रोलिंग सुरु केले आहे. गुरुवारी पहाटे 3. 00 वाजण्याच्या सुमारास टेंभीखोडावे येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.व या दरम्यान शुक्रवार 5 एप्रिल रोजी 11.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना केळवा सागरी पोलिसांनी माकूणसार गावाच्या हद्दीतील ब्राह्मणदेव मंदिरासमोरील रूपेश पाटील यांच्या घराच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनात आले.यावर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके,पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलीस हवालदार जयदीप सांबरे या टीमने तात्काळ धाड टाकून ११ जणांना अटक केले.व त्यांच्या जवळील रोख रक्कम जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 5 लाख 97 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .याप्रकरणी केळवा सागरी पोलिस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम (12 अ) प्रमाणे 1) विपुल म्हात्रे,2)सागर पाटील,3)किशोर मोहिते,4) अनिल घरत,5) संजय पंडिया,6) प्रवीण पाटील,7) जैलेश पाटील,8) करण जाधव,9) सचिन वर्तक,10) संदीप पाटील,11) राजेश ठाकूर सर्व राहणार माकुणसार या अकरा जणांवर केळवा सागरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.