सामाजिक

खडकी येथे महावितरणची घरगुती ग्राहकाची वसुली शंभर टक्के: वायरमन सुनिल कामटे यांचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील खडकी येथील विज वितरण कंपनीच्या घरगुती ग्राहकाची वसुली शंभर टक्के करण्यात आली आहे. वायरमन सुनिल कामटे यानी सलग तिस-या वर्षी महावितरणची बाकी खडकी गावच्या घरगुती ग्राहकाची बाकी वसुल करून थकबाकी शुन्य केली आहे. त्यामुळे वायरमन सुनिल कामटे यांचा सन्मान करण्यात आला. उपकार्यकारी अभियंता आशिष कलावते , सहाय्यक अभियंता सुनिल पवार यांच्या मार्गदर्शन खाली खडकीचे वायरमन सुनिल कामटे यांनी ही वसुली करून हॅटट्रीक केली आहे. खडकी येथील विज ग्राहकांची तिसऱ्यांदा थकबाकी शून्य केल्यामुळे त्यांचा सन्मान हार पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी शाखा अभियंता सुनिल पवार ,सेक्शन ऑफिसर अंगद वनवे, जीवन सांगडे, प्रशांत घाटे संग्राम शिंदे, गोकुळ वीर आदि मान्यवर कर्मचारी उपस्थित होते. सब डिव्हिजन मध्ये चार सेक्शन आहेत. त्यात पारेवाडी सेक्शन ग्रामीण एक सेक्शन व ग्रामीण दोन सेक्शन, करमाळा अर्बन अशी चार सेक्शन आहेत. या सेक्शन ची 29 गावे आहेत. खडकी गावात 95 ग्राहक असुन त्याची वसुली लाखो रुपयात असुन वायरमन कामटे यांनी थकबाकी शुन्य केली आहे . त्यामुळे सब डिव्हिजन मध्ये खडकी गावाचा पहिला नंबर आला आहे. वसुलीमध्ये पहिल्या लिस्टमध्ये खडकीचा पहिला क्रमांक आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी सर्वांचे आभार तारतंत्री सुनिल कामटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button