बापरे !! कल्याण परिमंडळात तब्बल इतक्या कोटीचे विजबिल थकीत

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज ग्राहकांकडे उच्चदाब, कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून १२० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या वीजबिल मागणतील जवळपास ९४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. त्यामुळे थकित वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या फिल्डवर आहेत. कल्याण परिमंडलात मार्च २०२३ अखेर ७ हजार ८५१ ग्राहकांकडे ५४ कोटी आणि एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान २ लाख ५२ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी ३० लाख कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

तर फेब्रुवारी महिन्यात वीजबिल भरण्याची मुदत संपलेल्या ३ लाख ५२ हजार ग्राहकांकडे जवळपास ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ५२ हजार ३३६ ग्राहकांकडे ८ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत ९८ हजार ७२७ ग्राहकांकडे ४६ कोटी ६३ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख ६ हजार ३२ ग्राहकांकडे २१ कोटी ८१ लाख तर पालघर मंडलातील १ लाख १२ हजार ९८८ ग्राहकांकडे ४२ कोटी ५४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे २७३ कोटींची थकबाकी याशिवाय कल्याण परिमंडलात थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले २ लाख ८५ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे तब्बल २७३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसई मंडल कार्यालयांतर्गत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले सर्वाधिक ९९ हजार असून त्यांच्याकडे १०१ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट असून त्यातून 286 कि.वॅट वीजनिर्मिती होणार आहे. नविन इमारतींवर विकासकांकडून 4 मे.वॅट क्षमतेची सौरऊर्जा संयत्रे उभारण्याचा मानस आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तलाव व डोंबिवलीतील निळजे येथील माऊली तलाव यांचे संवर्धन व पुर्नजिवन करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, आगामी वर्षात हे तलाव नागरीकांसाठी खुले होतील.
१) तलाव सुशोभिकरण व संवर्धन – रु. 41 कोटी.
२) स्मशानभुमी व अंत्यविधी स्थाने – महसुली रु. 5 कोटी व भांडवली रु. 2.50 कोटी.
३) नाट्यगृहे (रंगमंदिर)/क्रीडा केंद्राची व्यवस्था – रु. 9 कोटी.
४) उड्डाणपुल – रु. 30.00 कोटी.
५) विद्युत व्यवस्था – महसुली रु. 35 कोटी व भांडवली रु. 14 कोटी.
६) अग्निशमन – महसुली रु. 9 कोटी व भांडवली रु. 20 कोटी.
७) मुलभूत सोयी सुविधा, एमएमआरडीए, खासदार-आमदार निधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना इ. – शासन अनुदानातंर्गत विविध कामे करण्यात येणार असून, त्यापोटी रक्कम रु. 445 कोटी तरतुद करण्यात आली आहे.
८) रुणालये व दवाखाने – महसुली रु. 29.05 कोटी.
९) सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन – महसुली रु. 147 कोटी व भांडवली रु. 80.50 कोटी.
१०) प्रार्थमिक शिक्षण – महसुली रु. 81 कोटी व भांडवली रु. 1.50 कोटी.
११) दुर्बल घटक, शहरी गरीब – रु. 15 कोटी महसूली व रु. 34 कोटी भांडवली.
१२) महिला व बाल कल्याण कार्यक्रम – रु. 12.11 कोटी.
१३) दिव्यांग कल्याण व पुर्नवसन कार्यक्रम – रु. 12.25 कोटी.
१४) क्रीडा व सांस्कृतीक – रु. 2 कोटी. परिवहन व्यवस्था – रु. 66 कोटी.
१५) पाणी पुरवठा – महसुली रु. 154.30 कोटी व भांडवली रु. 461.40 कोटी.
१६) जलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 2.50 कोटी व भांडवली रु. 5 कोटी.
१७) मलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 37.10 कोटी व भांडवली रु. 45 कोटी.



