संपादकीय

बागलांचा भारतीय जनता पार्टी प्रवेशाने तालुक्यातील सत्तेचे समीकरण बदलणार,,,,, राजकीय विश्लेषक सुनील तळेकर यांचे मत

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्याच्या राजकारणात सहकार अडचणीचा ठरतो ही बाब चिंताजनक असून बागलांचा भाजप प्रवेश हे त्याचे उत्तम वैशिष्ट्य असल्याचे मत राजकीय विश्लेषक सुनील तळेकर यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील प्रमुख राजकीय गटापैकी एक असलेल्या बागल गटाचा २७ तारखेस भाजप प्रवेश आहे याबाबत आपले मत व्यक्त करताना तळेकर यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील राजकारण हे पूर्वीपासूनच गट तट मानणारे आहे. करमाळा तालुक्यातील सर्व सत्तांवर या गटाचे वर्चस्व राहिले आहे. तालुक्यातील श्री आदिनाथ आणि श्री मकाई हे दोन सहकार तत्वावर आधारित साखर कारखाने होय. मागील अनेक वर्षे या दोन कारखान्याचा चांगला सकारात्मक परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होत असे. यातील एक कारखाना जरी ताब्यात असेल तर विधानसभा निवडणूक लढवताना त्याचा फायदा होत असत. परंतु मागील काही वर्षापासून हे सहकारी साखर कारखाने सत्ताधारी मंडळींना अडचणीचे ठरू लागले. यास अनेक कारणे असली तरी सहकारातील बदलते नियम, प्रमाणापेक्षा जास्त पर्याय आणि अनियमित कारभार यामुळे कारखाने चालवताना जिकरीचे होऊन बसले. यामुळेच मग सन २०१४ पूर्वी अतिशय चांगली मजबूत स्थिती असलेल्या बागल गटास या दहा वर्षाच्या कालावधीत अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. दोन्ही कारखाने ताब्यात असणे याचा फटका बागल गटास बसला आणि शेवटी यातील एक तरी कारखाना वाचवता येण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने बागल गटाचे भाजप प्रवेशा बाबत प्रयत्न सुरू झाले. यास अखेर यश आले असून या प्रवेशामागे कोणत्या अटी व शर्ती आहेत हे अजून बाहेर आले नाही. मकाई कारखान्यास किती कोटींचे पॅकेज हे आर्थिक सहकार्य म्हणून मंजूर झाले आहे हा आकडा अजून समजला नाही. तूर्तास लोकसभा निवडणूक पार पाडणे आणि यात भाजपा उमेदवाराच्या मागे बागल गटाने पूर्ण ताकद लावणे या एकाच अटीची अंमबजावणी आगामी काळात होताना दिसून येणार आहे. बागल गटास भाजप प्रवेश हा ऊर्जा देणारा असणार आहे. यामुळे आगामी काळात बागल गटास सोडून गेलेले कार्यकर्ते परतीच्या वाटेवर असतील. तर पक्ष म्हणून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनाही आगामी काळात करमाळा तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष संघटना वाढवण्यासाठी सोपे जाणार आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीवर या प्रवेशाचा परिणाम होणार असून सत्तेची समीकरणे बदलली जाण्यास हा निर्णय पूरक ठरेल का हे आगामी काळात समजणार आहे. एकंदरीत बागल गटाचे या दहा वर्षातील संघर्षाचे मोजमाप केल्यास करमाळा तालुक्याच्या राजकारणावर सहकाराचे परिणाम हे किती खोलवर परिणाम करू शकतात हे या घटनेमुळे दिसून आल्याचे मत तळेकर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button