डहाणू केटी नगर येथील हैदर बेगसवाला यांच्या घरी भर दिवसा साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालाची घरफोडी करून चोर फरार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
आई आणि मुलगा आपले घर बंद करून गेल्याची संधी बघून डहाणू केटी नगर येथील हैदर बेगसवाला यांच्या घरी शनिवारी भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरांनी घरातील रोख रकमेसह सोने असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून चोर फरार झाले आहेत.

डहाणू केटी नगर बिल्डींग नंबर 11- B येथे राहणारे (21) वर्षीय हैदर बेगसवाला आणि त्याची आई शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता आपल्या खाजगी कामासाठी मुंबई येथे गेले होते. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी घराच्या दरवाज्याची कडी तोडून घरातील बंद लाकडी कपाटातील एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम आणि चार लाख रुपये किमतीचे सोने असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करून हे चोर फरार झाले आहेत.या घटनेची पाहणी करून डहाणू पोलिसांनी डहाणू पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस करत आहेत.



