मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील खोडाळा ते कसारा रोडवरील मध्य वैतरणा नदीवरील पुलावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
ठाणे प्रतिनिधी राजेंद्र भगवान भोईर
(मो.9028305319)
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०३/०२/२०२४ रोजी कारेगाव गावचे शिवारात खोडाळा ते कसारा जाणारे रोडवरील मध्य
वैतरणा नदीवरील पुलावर अज्ञात पुरुषाचा मृत्यदेह आढळून आला आहे. सदर मयत हा २५ ते ३० वयोगटातील इसम असून त्याचे डावे हातावर राणा रजपूत मराठी अक्षरात गोंदलेले
उजव्या हातावर मराठीत आईबाबा व त्यापुढे लव चे चिन्हामध्ये इंग्रजीत S.D.अक्षर गोंदलेले अंगठ्याजवळ मराठीत तमन्ना असे अक्षर गोंदलेले त्याचे अंगात गोल गळ्याचा हाफ बाह्याच्या छातीवर वरच्या बाजूस सफेद रंगाचा व त्याखाली पिस्ता रंगाचा टीशर्ट व काळ्या रंगाचा फुल पॅन्ट,
गळ्यात थंडीसाठी वापरण्यात येणारा सफेद निळ्या जांभळ्या रंगाचा गोल स्कार्प अशा वर्णनाचा मृतदेह आढळला आहे. या मयत इसम वय २५ ते ३० वर्ष यास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचे हात पाय बांधून त्याचे डोक्यात, छातीवर, हातावर धारधार शस्राने वार करून तसेच गळ्यास कपड्याचे दोरीने आवळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुलावरून खाली टाकून जिवे ठार मारले. गुन्हा मोखाडा पोलीस ठाण्यात रजि क्र.१८/२०२४ भादविस कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल केला आहे, तसेच अज्ञात मयत पुरुषाच्या नातेवाईकांचा शोध व गुन्हेगाराचा अधिक तपास चालू आहे, असे मोखाडा पोलीस ठाणे चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप गिते साहेब यांनी सांगितले.