15 व्या राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून मुंबई दिंडोशी विधानसभेचे मतदार नोंदणी अधिकारी दयाल सिंग ठाकूर यांच्या हस्ते अधिकाऱ्यांना सन्मानित
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
जिल्हाधिकारी मुंबई उपनगर तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी 159 दिंडोशी विधानसभा मुंबई या कार्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकां मध्ये केलेल्या उल्लेखनीय उत्कृष्ट सुरळीत नियोजनबद्ध कामकाजाबद्दल केंद्रस्तरीय मतदान अधिकारी व या विभागातील अनेक शाळांमध्ये 15 व्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
त्या स्पर्धांमध्ये निवडणुकीचे महत्त्व पटवून देणाऱ्या बाल चित्रकार व निबंधकार प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई दिंडोशी विधानसभेचे मतदान नोंदणी अधिकारी दयाल सिंग ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना
दयाल सिंग ठाकूर यांनी एका व्यक्तीच्या एका मतदाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आवाहन केले .
यावेळी या कार्यक्रमाला संस्कार कॉलेजचे प्राध्यापक डॉ.एम एस कुऱ्हाडे, सहाय्यक मतदान अधिकारी विजयकुमार चोबे, अतिरिक्त सहायक मतदान अधिकारी श्रीमती ज्योती तांबे, मालाड कुरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कारवेकर या मान्यवरांसह केंद्रस्तरीय निवडणूक अधिकारी उपस्थित होते.