शाहीन फाउंडेशन चा तिसरा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्युज नेटवर्क,अकलूज
9890299499
सामुदायिक विवाह सोहळ्या साठी “शाहीन फाउंडेशन” हि संस्था गेली दोन वर्षे सोलापूर शहरा सह सबंध जिल्ह्यात आपल्या नावाने आणि कामाने गाजत असलेली एक सामाजिक संस्था,आज या संस्थेचा तिसरा ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळा एम ए पानगल स्कूल मैदानावर पार पडला,पहिल्या वर्षी या संस्थेने 33 जोडप्यांची विवाह गाठ बांधली अन् अल्पावधीतच “शाहीन फाउंडेशन” हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले,गेल्या वर्षी फाउंडेशन ने जवळ जवळ साठ (60) विवाह विना मोबदला ते हि सर्व वधु वरांना त्यांना लागणाऱ्या सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देऊन अन् आलेल्या सर्व पाहुण्याची जेवणाची व्यवस्था करुन केली होती…
एखाद्या राजेशाही सोहळ्याला लाजवेल असा तिसरा सामुदायिक विवाह सोहळा शाहीन फाऊंडेशन ने या वर्षी हि आयोजित केला होता,या वर्षी एकूण 75 जोडप्यांचे विवाह अगदी थाटामाटात पार पडले…
“निकाह को आसान करो” हे ब्रीद वाक्य घेउन निघालेले सोलापुरातील काही “अवलीया” तरुणांनी एकत्र येऊन समाजा समोर “माणुसकी” चे एक वेगळे उदाहरण दिले,गेल्या दोन वर्षी प्रमाणे याही वर्षी फाउंडेशन ला सोलापूर शहरासह जिल्हयातील समाज बांधवांनी भरघोस असा प्रतिसाद देत “सामुदायिक विवाह” सोहळा हि एक काळाची गरज आहे हे पटवून दिले…
कसलाही गाजावाजा न करता फक्त समाजाच्या प्रत्येक जडण घडणीत आपला हि वाटा असावा हा एकमेव उदात्त हेतू “शाहीन फाउंडेशन” ने तंतोतंत पाळत समाजा समोर एक नवीन आदर्श ठेवला,आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि आपल्या कडून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी थोडीफार मदत व्हावी ह्या भावनेने साकारलेले “सत्कर्म” म्हणजेच आज आम्ही पाहिलेला आणि प्रत्यक्ष अनुभवलेला (75) जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा…
या विवाह सोहळ्या साठी सोलापूर,अक्कलकोट,पंढरपूर,मोहोळ,अकलूज,बार्शी,कुर्डूवाडी सह कर्नाटक च्या गुलबर्गा,इंडी,बिजापूर येथील समाज बांधवांनी हजेरी तर लावलीच होती परंतु शहरातील प्रत्येक माणसांची पावले आज पानगल स्कूल कडे आपसूकच वळत होती…
या विवाह सोहळ्या साठी हाजी फारुकभाई शाब्दी,हाजी तौफिकभाई हत्तुरे यांच्या सह शहरातील नामवंत मंडळींनी हजेरी लावली हे विशेष…
या ऐतिहासीक सामुदायिक विवाह सोहळ्यात अकलूज हुन आलेल्या बागवान बिरादरी ने “शाहीन फाउंडेशन” चे प्रमुख उमरभाई (M राऊंड),जिलानी कुरेशी,मिनहाज हत्तुरे,बाबा हाजी कुरेशी,सईद नाईकवडी,राजा बागवान,जावेद (अण्णा) KD यांच्या सह फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार एकाच भल्या मोठ्या पुष्पहारात केला,यावेळी हाजी जमीर चौधरी,अकलूज ग्रामपंचायत चे माजी मेंबर जावेद बागवान,दादाभाई तांबोळी मेंबर,टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर,राजू मोतीलाल (MM),मोहसीन बागवान,नाझीम खान,मुन्नाभाई चौधरी,छोटा जावेद बागवान यांच्या सह मनोज पोटे (सावकार) आणि मातंग समाजाचे मार्गदर्शक शिवा साठे यांनी हि आपली उपस्थिती दर्शविली…