पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्यकोकण विभागाची बैठक संपन्न
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250128-WA0021-780x470.jpg)
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
विक्रमगड जिल्हा पालघर येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कोकण विभागाची बैठक रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी पार पडली. ही बैठक कोकण विभाग अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नियोजनाखाली विक्रमगड संत रोहिदास नगर संभाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल जोरे ( युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) व उपाध्यक्षस्थानी सौ पुजा परदेशी ( उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षा ) म्हणून उपस्थित होत्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे सर यांनी भ्रमणध्वनी द्वारे जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थे बद्दल माहिती दिली. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित मांडले, राहुल जोरे यांनी संस्थे विषयी विस्तृत माहिती दिली व संस्थेच्या कामाची पद्धत समजावून सांगितली. सौ पूजा परदेशी यांनी महिलांवर होणारे अन्याय व त्या विरुद्ध करता येनाऱ्या कारवाया या बद्दल माहिती दिली.
नवनिर्वाचित पालघर जिल्हा अध्यक्ष पंकज पाटील यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना संबोधित केले. तर ओंकार पोटे यांनी सूत्र संचालन केले.
संस्था वाढीसाठी व लोकांना सेवा देण्यासाठी एकत्रित कसे काम करता येईल या साठी प्रश्न विचारून उत्तरे घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.