“रत्नाईच्या कृषी कन्यांकडून कडून माळीनगर येथील नागरिकांना पी आर ए तंत्रज्ञानाद्वारे विशेष मार्गदर्शन “

प्रतिनिधी- रियाज मुलाणी मो.9921500780
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या रत्नाईच्या नऊ कृषी कन्यांनी संपूर्ण गावाची संक्षिप्त माहिती माळीनगर गावातील नागरिकांना विविध रंग वापरून तयार केलेल्या नकाशाद्वारे (पीआरए तंत्रज्ञानाद्वारे) मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनादरम्यान कृषी कन्यांनी गावातील नागरिकांना गावांमध्ये असलेले विविध प्रसिद्ध ठिकाणे सरकारी दवाखाना, प्राथमिक शाळा, पाण्याची टाकी, बँक, कारखाना व मंदिर आणि अजून वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती व गावातील मार्ग हे सर्व नकाशांमध्ये चिन्ह वापरून नागरिकांना पी आर ए तंत्रज्ञान उपक्रम घेऊन कृषीकन्यांनी पटवून दिले. त्यावेळी माळीनगर गावातील नागरिकांचा खूप प्रतिसाद लाभला. पी आर ए तंत्रज्ञान हा उपक्रम राबवताना गावातील निशा दळवी, सचिन दळवी, अर्चना दळवी, भक्ती जाधव, राजेंद्र दळवी इ. नागरिक उपस्थित होते.

तसेच गावचे प्रमुख सरपंच अनुपमा एकतपुरे ,उपसरपंच अतुल कांबळे, ग्रामसेवक कैलास सुरवसे व कृषी सहाय्यक सारिका एकतपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. आणि तसेच रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज प्राचार्य आर. जी नलवडे कार्यक्रम समन्वय प्रा. एस .एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम चंदनकर आणि प्रा. एच. व्ही.कल्याणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये कृषी कन्या प्राची जाधव, ईशा घोगरे, प्रणाली यादव, स्नेहल तांबोळकर, कोमल लाड, प्रतीक्षा हेगडे, सोनाली गायकवाड, जिजाऊ बर्डे, प्रतीक्षा बनसोडे यांचा समावेश होता आणि तसेच माळीनगरीतील नागरिक उपस्थित राहिले होते.