अमृतसर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा…रिपाइंची मागणी

आमीर मोहोळकर
अकलूज प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज
अमृतसर येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात-कठोर शासन करण्यात यावे,तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह महाराष्ट्रासह भारत देशातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं आठवले माळशिरस तालुका यांच्या वतीने माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली देशाचे गृहमंत्री अमितजी शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे माळशिरस तहसीलदार यांच्यामार्फत निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांना देण्यात आले….
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविण्यात आला…
यावेळी प.महा उपाध्यक्ष एन के साळवे,युवा प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले,जि.सचिव रमेश धाईंजे,जि.सचिव भारत आठवले,मा.जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,सरचिटणीस मारुती खांडेकर,युवा तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,अकलूज शहर अध्यक्ष अजित मोरे,तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके,तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे,युवा तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे,तालुका उपाध्यक्ष महेंद्र लोंढे,ता.मार्गदर्शक प्रा.भास्कर बनसोडे,ता.संघटक प्रकाश गायकवाड,युवा ता.उपाध्यक्ष बाबुराव भोसले,युवा जि.उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे,ता.उपाध्यक्ष सुनील ओवाळ,प्रसिद्धी प्रमुख मारुती शिंदे,मार्गदर्शक तात्यासाहेब लोंढे,शाखा अध्यक्ष प्रशांत साळवे,श्रीपुर शहराध्यक्ष गणेश सावंत,सुनील साठे,अशिफ शेख,रमेश भोसले,तानाजी बाबर,प्रशांत खरात,सागर(बन्नी)धाईंजे,दादासाहेब गालफाडे,महावीर खंडागळे,हारीभाऊ साळवे,सतिश गायकवाड,दिपक भोसले यांच्या सह बहुसंख्य भीमसैनिक उपस्थित होते…