भारतीय जनता पार्टी नागरिकांना त्रास होऊ देणार नाही – महेश शिंदे.उपविभागीय कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी यांना कारवाईचे आदेश.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशनला नवीन बाजार तळावर, फत्तेसिंह नगर या ठिकाणी प्यायला बसणाऱ्या दारुड्यांपासून व चोरट्यांपासून नागरिकांना त्रास होत असल्या संदर्भात तक्रार केली होती यावर त्वरित पर्याय मार्ग काढत उपविभागीय कार्यालय अकलूज यांनी उपविभागीय अधिकारी यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

कारवाईनुसार नवीन बाजार तळावर दररोज पोलीस गाडी येत असून दारुडे पळता भुई सपाट होत आहेत. यावर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेश शिंदे म्हणाले की नवीन बाजार तळावर दारुडे दारू घेऊन दारू प्यायला बसलेले असतात त्यामुळे नागरिकांना, महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते हा त्रास कमी होण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामध्ये तक्रार केली म्हणून आमच्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो हल्ला झाल्यास कायदेशीर कारवाई करूच परंतु नागरिकांना त्रास होणार नाही याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी ने घेतली आहे. सध्या आपलं पोलीस स्टेशन कारवाई करताना दिसत आहे परंतु कडक कारवाई न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करणार आहोत.