प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पालघर जिल्ह्यातील भाताणे येथे विविध विकासकामांचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250128-WA0019-780x470.jpg)
टाईम्स 9 मराठी मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत
7030516640
पालघर जिल्ह्यातील भाताणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. 50 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात माजी आमदार राजेश पाटील यांचा महत्त्वाचा पाठपुरावा असून या कामांना सुरुवात झाली आहे.
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2025/01/1001243728-1024x768.jpg)
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावाचे सरपंच हितेश बाडगा, उपसरपंच हेमराज कासार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, ग्रामपंचायत सदस्य योगेश कडू,बबन नामकुडा, मंगळ भोये ,माळवी मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना सायरे, तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जयदीप कासार,संजय पाटील, जयेश कासार,अविनाश सुतार, स्वप्निल कासार, मनोज कासार, महेश कासार कल्पेश माळवी, सुरेश वारठा प्रभाकर माळवी आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना सांगितले की, “ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी निधी मिळवून आणण्यावर भर दिला जात आहे. विकासकामांच्या माध्यमातून भाताणे गावाला आदर्श गाव बनवण्याचा आपला प्रयत्न राहील.”