संपादकीय

धैर्यशील मोहिते पाटील हेच का असावेत २०२४ माढा लोकसभेचे कमळ चिन्हाचे, भाजपाचे उमेदवार….!!

२०२४ लोकसभेचा बिगुल वाजला आहे.. आणि महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज मतदारसंघ असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघावर यंदा भाजपाकडून हेवीवेट युवानेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा करून अगदी उघड आणि ठामपणे पक्षाची उमेदवारी मागितलेली आहे..माढा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचाच झाला तर फार लांब जायची गरज नाही..२००९ ला तयार झालेला हा मतदारसंघ..इथून पहिल्या निवडणूकीत तत्कालिन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदजी पवार निवडून गेले…२०१४ ला देशात प्रचंड मोठी अशी ‘मोदी लाट’ असताना तेंव्हाचे इथले स्टँडिंग खासदार शरदजी पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्यावर इथे मा. उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील हे निवडणूक लढवून विजयी झाले होते..तेंव्हा एकट्या माळशिरस तालुक्याने विजयदादांच्या पारड्यात जवळपास ७५,००० मतांचे लीड दिलेले होते..परंतु याचवेळी नेमके तेंव्हा माढा लोकसभेमधून त्यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंहजी मोहिते पाटील यांनी सुद्धा निवडणूक लढविलेली होती व त्यांनाही जवळपास २७,००० मत मिळालेली होती..ती मते ही बहुतेक करून माळशिरस तालुक्यातील बहुसंख्य होती..म्हणजेच २०१४ ला सुद्धा माढा लोकसभेत १ लाख मतांचं लीड मोहिते पाटील यांच्याकडे होते..तशाच प्रकारे १ लाखहुन अधिक लीड त्यांनी जाहीररीत्या सांगून २०१९ ला आत्ताचे विद्यमान खासदार रणजितसिंहजी नाईक निंबाळकर यांना फक्त माळशिरस तालुक्यातून दिलेले होते..तसेच सोबतच इतर तालुक्यातून सुद्धा तुलनेने अगदीच नवख्या असणाऱ्या रणजितसिंहजी नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून देण्याचे मोठे काम मोहिते पाटील गटाने केलेले होते..अर्थात, सारासार विचार केल्यास, मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे नाते हे वेगळं सांगायची गरज नाही..संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत..सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशीलकुमारजी शिंदे हे जेंव्हा लोकसभेचा राजीनामा देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेंव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घरातील स्व. प्रतापसिंहजी मोहिते पाटील यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धवस्त करत मोठ्या मताधिक्याने तो सोलापूर लोकसभा मतदारसंघ ऐतिहासिक विजय साकारत भाजपकडे खेचून आणण्याची किमया केलेली होती..यावरूनचं मोहिते पाटील गटाची सोलापूर जिल्ह्यातील ताकत दिसून येते..एवढंच नाही तर जेंव्हा २०१९ ला मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश केला, तेंव्हा सोलापूर बरोबरच शेजारच्या जिल्ह्यातील असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही याचे पडसाद उमटलेहोते..त्यावेळी स्वतः मा.विजयसिंहदादा मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यावेळी बारामती व सोलापूर लोकसभेसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता..एकूणच माढा लोकसभे बरोबरचं शेजारी असणाऱ्या सोलापूर व बारामती लोकसभेवर ही मोहिते पाटील यांची उमेदवारी आजही प्रभाव पाडू शकते याची जाणीव आणि पुरेपूर माहिती भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला नक्कीचं आहे अशी खात्री आहे..परंतु, काहीतरी गोळाबेरीज व खोटी आकडेमोड दाखवून मोहिते पाटील यांना माढा लोकसभेला डावलण्याचा प्रयत्न जर पक्षाने दुर्दैवाने केला तर शेजारचे बारामती आणि सोलापूर या २ लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांचे कार्यकर्ते वजाबाकी केल्याशिवाय राहणार नाहीत असचं एकंदरीत सध्याच चित्र आहे..कारण मोहिते पाटील गटाच्या अगदीच सर्वसामान्य कार्यकर्त्यानेच आता ही निवडणूक स्वतः हातात घेतली आहे..पुढे जाऊन विधानसभा निवडणुकीत हा ‘मोहिते पाटील’ फॅक्टर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रभावी ठरू शकतो हे पंढरपूर मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत दिसून आलेलं आहे..खरंतर,मोहिते पाटील यांचा प्लस पॉईंट जर काय असेल ना तर, तर तो आहे माळशिरस तालुक्याबाहेर प्रत्येक तालुक्यातील त्यांचे असणारं कमी अधिक प्रमाणातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच जाळ….!!गेल्या ३ पिढ्या मोहिते पाटील यांचे कडे सत्ता असो अथवा नसो, हे कार्यकर्ते आजही घट्ट नाळे सारखे मोहिते पाटील यांना चिटकलेले दिसतात..जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीवेळी मोहिते पाटील यांची मदत हवी असते.. किंबहुना तसा आग्रह ते त्यांच्या वरिष्ठांकडे करताना मी स्वतः अगदी जवळून पाहिलेलं आहे..सध्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपा पक्षाकडे यंदा माढा लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली आहे..नरेंद्रजी मोदी यांच्या पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यासाठी जे सबळ कारण व काम दाखवाव लागत ते मोहिते पाटील गटाने गेली ५ वर्षे रात्रीचा दिवस करून, करून दाखवलेलं आहे..कस ते आपण बघू..

१) अवघ्या १७ दिवसात अनोळखी असणाऱ्या माणसाला खासदार करून दाखविले आहे..

२) अवघ्या १५ दिवसात अनोळखी असणाऱ्या व मतदारसंघाच्या बाहेरील पक्षाने दिलेल्या युवा भाजप कार्यकर्त्याला आमदार करून दाखविले आहे..

३)भाजपात पक्ष प्रवेश केल्यावर स्वतःचे ६ सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अपात्र होण्याची भीती होती..त्यावेळी सुप्रीम कोर्टापर्यंत मोहिते पाटलांनी एकहाती झुंझ दिली व सोलापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर करून ऐतिहासिक भाजप सेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखविला..

४) पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचार करत भाजपच्या समाधानदादा आवताडे यांना जिंकायला मदत केली..

५) सर्व नगरपंचायत, नगरपालिका जिंकून दाखविल्या..ग्रामपंचायत, सह सोसायटी, मार्केट कमिटी,साखर कारखाने इ. एकहाती जिंकलेल्या आहेत..

६) मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने भाजप मध्ये प्रवेश केल्या पासून तण, मन,धनाने, पक्ष देईल ती जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडलेली आहे..

७) धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे..संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील बूथ यंत्रणा त्यांनी सक्षम केलेली आहे..सर्व कमिटी स्थापन केल्या आहेत, पक्षाचे ध्येय, धोरण, विचार अगदी तळागाळातील सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचविलेले आहेत..पक्षाचे सर्व कार्यक्रम, मन की बात असो किंवा इतर कार्यक्रम असो हे १०० % राबिविले आहेत..

८) आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही पक्षाची सर्व ध्येय, धोरणे आणि विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्याच काम केलेले आहे, संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्याचे सुद्धा सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे..पक्ष देईल ती जबाबदारी घेऊन अगदी गोवा व मध्य प्रदेश इथं जाऊन निवडणूक आणि पक्ष संघटनेचे काम केले आहे..

९) माढा लोकसभेच्या प्रत्येक तालुक्यात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तरुणांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या बंधुंची जबरदस्त क्रेझ आहे..

१०) कला, क्रीडा, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक अशा सर्वचं क्षेत्रात धैर्यशील मोहिते पाटील यांच काम आहे..शिवरत्न नॉलेज सिटी, ताराराणी महिला कुस्ती संकुल, ‘शिवामृत’ दूध, विजय प्रताप मंडळाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा असतील, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, हँडबॉल असोसिएशन अशा अनेक ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील कार्यरत आहेत..

११) ग्रामपंचायत ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद या प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाचा त्यांना प्रचंड अनुभव आहे..

१२) धैर्यशील मोहिते पाटील हे उत्कृष्ठ संघटक आहेत..कार्यकर्त्यांच मोठं जाळ त्यांच्याकडे आहे.. मोठं मोठ्या निवडणुका लढवण्याचा आणि प्रत्यक्ष ग्राऊंड वर त्या हाताळण्याचा दांडगा अनुभव त्यांचा कडे आहे..निवडून येण्याच्या मेरिटसाठी लागणारा हरएक पल्स पॉईंट सगळे, सगळे आहेत..आणि म्हणूनचं ‘धैर्यशील मोहिते पाटील’ नावाचा माणूस अगदी बिंदास्त छातीठोकपणे आपल्या हक्काच्या मतदारसंघावर यंदा दावा करतोय..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button