बापाचा खून करणाऱ्या आरोपी पुत्राला अवघ्या 4 तासात पालघर कासा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केले जेरबंद
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील एका ( 65) वर्षीय इसमाच्या खुनाचा गुन्हा कासा पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याची उकल अवघ्या 4 तासात करून आरोपी पुत्राला जेरबंद करण्यात कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला यश आले आहे. कासा पोलीस ठाणे हद्दीत वनविभागाच्या जागेत शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी कृष्णा रामा डोंगरकर वय वर्ष( 65) राहणार सोमटा घाटाळपाडा (कासा ) यांचा खून झाला होता. या खुनाचा तपास करताना (मयत) कृष्णा रामा डोंगरकर यांचा मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर (आरोपी) यांनीच जमिनीच्या वादातून आपल्या बापाच्या गळ्यावर धारदार लोखंडी विळ्याने वार करून त्यांचा खून केल्याची कबुली कासा पोलिसांना दिली आहे. हा खून त्यांनी आपल्या घरातच करून त्याचा चुलत भाऊ विलास चिंतू डोंगरकर याच्या सहाय्याने कृष्णा डोंगरकर (मयत )यांचा मृतदेह सोमवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी कासा पोलीस ठाणे हद्दीतील सोमटा घाटालपाडा येथील वन विभागाच्या जागेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिला होता. मात्र अधिक तपास करत असताना (मयत )कृष्णा डोंगरकर हे त्यांचा मुलगा (आरोपी)रामदास कृष्णा डोंगरकर याला जमिन मिळून देणार नसल्याचे गावभर सांगत होते याचा राग म्हणून रामदास कृष्णा डोंगरकर यांनी आपल्या बापाचा खून केला व त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून देताना त्याचा चुलत भाऊ विलास डोंगरकर यांनी त्याला मदत केली होती. अशी कबुली रामदास कृष्णा डोंगरकर यांनी पोलिसांना दिल्यावर या दोघांना त्यांच्या घरातून अटक करून त्यांना जेरबंद करण्यात आल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली आहे. सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल विभुते प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा पालघर, कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, पोलीस हवालदार कैलास पाटील, पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, पोलीस हवालदार संजय धांगडा, राकेश पाटील, दिलीप राऊत नरेश पाटील, सर्व स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच सहाय्यक फौजदार आर. के.चौधरी पोलीस हवालदार राजु भोये,पोलीस हवालदार नाईक,पोलीस हवालदार सुनील गावंढा, पोलीस हवालदार मनोज भोये, पोलीस हवालदार योगेश भोये सर्व नेमणूक पोलीस ठाणे कासा यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.